उरुळी कांचन अखिल तुपे वस्तीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील यांच्या आर्केस्ट्राने तरुणाईची मने जिंकली

उरुळी कांचन

उरुळी कांचन अखिल तुपे वस्ती दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी उत्सवाला प्रथमच साहसी खेळाचा दर्जा देण्यात आल्यामुळे गोविंदाने मोठ्या प्रमाणावर खेळाचा आनंद लुटला दहीहंडी उत्सवा मध्ये खेळाचे प्रमुख आकर्षण म्हणून ठरलेला गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा यांची प्रमुख उपस्थितीने बालगोविंदाचे तसेच रसिकांची मने जिंकली.

मोरया ग्रुपने प्रथम पाच थर लावून सलामी दिली तसेच श्रीकृष्ण दहीहंडी मित्र मंडळाने सहा थर लावून दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.

कार्यक्रमाचे संयोजन अशिष तुपे, सिद्धांत फुलवरे, नवनाथ जगताप अजिंक्य काटे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदेश तुपे यांनी केले तसेच अमित बाबा तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी माजी उपसरपंच सुनील कांचन पाटील, सोरतापवाडीचे माजी सरपंच सुदर्शन चौधरी, भाजपचे अजिंक्य कांचन, बाबा चौधरी, अनिल कांचन, देलवडीचे सरपंच नीलम ताई काटे, रोहित तुपे, रामदास तुपे, स्वराज्य तुपे, सुनील तुपे, आकाश तुपे, किरण तुपे सह अनेक युवा तरुणांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.

Previous articleगणेशोत्सवानिमित्त चिमुकल्यांनी सजवले बालगणेशाचे रूप
Next articleशरद पाबळे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष : दोन सप्टेंबरला पुण्यात सत्कार