Home Blog Page 82

गणेशोत्सवानिमित्त चिमुकल्यांनी सजवले बालगणेशाचे रूप

घोडेगाव : राष्ट्रीय विकास केंद्र संस्थेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे गणेशोत्सवानिमित्त गणेश मुर्तिचे रंगभरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 300 मुलांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने पर्यावरण पूरक गणपती बनविला जाऊन पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने विद्यालयात गणपती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग व जलतरंगाचा वापर करून आपल्या लाडक्या बाप्पाचे रूप सजवले.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश ठाकुर यांनी गणेशोत्सवाचे महत्व पटवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा या विषयी मार्गर्शन केले,त्याच बरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यान मधिल सृजनशीलता व कलेला वाव मिळण्यासाठी हि कार्य शाळा घेण्यात आली . या स्पर्धेत पुढील 8 विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट मुर्ति रंगकामाचे क्रमांक मिळवले.

लहान गट
प्रथम – रुद्र सोमवंशी, व्दितीय – खुशी उकिरडे,तृतीय- नम्रता जगदाळे, उत्तेजनार्थ लक्ष्मी धादवड.

मोठा गट

प्रथम – तनुजा सोमवंशी,व्दितीय ऋतुजा मिडगे,तृतीय अक्षदा काळोखे, उत्तेजनार्थ सिध्दी नेहरे. गणेश मूर्तीचे परीक्षण सौ.माणिक शिंदे,सौ.वैशाली काळे, श्री.संजय वळसे, सौ.वंदना मंडलिक, सौ.लक्ष्मी वाघ, श्री. वैभव गायकवाड, सौ.गौरी विसावे, श्रीम.नीलम लोहकरे यांनी केले. तर कार्यशाळेचे नियोजन श्री.संतोष पिंगळे,श्री.सुभाष साबळे,श्री.गुलाब बांगर,श्री. लक्ष्मण फलके यांनी केले

महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने हवेली तालुक्यातील किर्तनकार मंडळींना हवाई सफर

उरुळी कांचन

पुण्यातील महालक्ष्मी एव्हीएशन कंपनीच्या वतीने हवेली तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्रात दैदिप्यमान काम करणाऱ्या किर्तनकार मंडळींना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मोफत हवाई सफर घडविण्यात आली. महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन दत्तात्रय गोते व उद्योजक बाळासाहेब भोसले पाटील यांनी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे यांच्या माध्यमातून ही सफर आयोजित करण्यात आली होती. वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य पूर्ण जगभर व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सदरील सफरीचे आयोजन करण्यात आलेले होते.

यावेळी पी डी सी बँकेचे अधिकारी तुळशीराम गोते, हभप आनंद महाराज तांबे, हभप विनोद महाराज काळभोर, हभप चेतन शास्त्री माथेफोड, हभप जीवन महाराज शिंदे, हभप जंजीरे महाराज, हभप चेतन शिंदे, हभप प्रा सचिन महाराज माथेफोड, सह प्रा.सुरेश वाळेकर यांच्या हस्ते गोते परिवाराचे आभार व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

बांधकाम कामगारांची नगरपरिषद स्तरावर नोंदणी करण्याची मागणी

दिनेश पवार:दौंड

बांधकाम कामगारांची नगरपरिषद स्तरावर नोंदणी करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ कामगारांना देण्यात यावा यासाठी दौंड नगरपरिषदकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी मजूर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गडेकर यांनी सांगितले की कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी तसेच त्यांना शासनाचे सर्व लाभ देण्याचा शासन निर्णय आहे,या निर्णयानुसार सर्व कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिले आहे,

यावेळी पांडुरंग गडेकर,तयब मुलाणी, रवींद्र सलगर,राजू सांगळे,बापू भुजबळ, शैलेश गायकवाड, रवी पवार, भागवत पासलकर,प्रेम अभिचांदनी,संजय साळेकर,इब्राहिम पटेल, आमित साबळे इत्यादी उपस्थित होते

उरुळी कांचन बाजारपेठ मध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; बाजारात साहित्य दाखल

उरुळी कांचन

गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. बाजारात गणेशोत्सवाचे साहित्य दाखल होऊन बाजारपेठ साहित्यांनी बहरत आहे. दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांची देखील वर्दळ सुरु झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या दिवसांंवर येऊ ठेपला आहे. त्यामुळे उरुळी कांचन बाजारपेठत रंगीत कागद, तयार डेकोरेशन, विद्युत रोषणाईच्या माळा, प्लॅस्टिकचे हार, फुलदाणींंची रेलचेल आदी सजावटीसाठी लागणारे साहित्यांनी दुकाने गजबजून गेली आहे.

एलईडीतील रंगबेरंगी विद्युतमाळांना सध्या विशेष पंसती मिळत आहे. ८० रुपयांपासून पुढे विद्युतमाळा उपलब्ध आहेत. गौराईचे मुखवटे, चंदनहार, मोत्यांची माळ, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा, लटकण, आरास बनविण्यासाठी विक्री होत आहे. यंदा १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुजेच्या साहित्यांची दुकाने देखील सजली आहेत

शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जल्लोषात स्वागत ! फटाके फोडून, पेढे वाटून कार्यकर्त्यांचा जल्लोष

योगेश‌ राऊत ,पाटस

सत्तापिपासू भाजपाकडून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू असून, महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची घोषणा करत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका राज्यातील जनतेसमोर स्पष्ट केली असून, याच पार्श्वभूमीवर आज दि.२७ रोजी जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी यांनी शिवसेना कार्यकारणीबरोबर समन्वय साधून आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सुनिल पासलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड , निलेश जांबले, जिल्हाउपाध्यक्ष , शेतकरी आघाडी, संभाजी ब्रिगेड , कुलदीप गाढवे देशमुख , तालुकाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड , विजय भोसले , तालुकाध्यक्ष ,विद्यार्थी आघाडी संभाजी ब्रिगेड , स्वरूप ताकवणे तालुका उपाध्यक्ष , भरत भुजबळ जिल्हा संघटक , रसूल मुलाणी ,प्रवक्ते संभाजी ब्रिगेड , सुनिल टेंगले , सोमनाथ मोरे , सिद्धार्थ देवकर, रणजीत देवकर संजय वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रमुख महेश पासलकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती ही आगामी काळात राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी असून, आमचे हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड शिवसेनेबरोबर आली असून, राज्य घटनेच्या संरक्षणासाठी ही युती निर्णायक लढा देईल असा विश्वास यावेळी पासलकर यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पासलकर म्हणाले की, दौंड तालुक्यातील आगामी निवडणुकात शिवसेना व संभाजी ब्रिगेड समन्वयाने काम करणार असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध विषयावर आक्रमकपणे आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेच्या समारोपानंतर शिवसेना कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या व शिवसैनिकांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.

गरुडझेप मोहिमेचं’ शिवजन्मभूमीत जल्लोषात स्वागत

नारायणगाव : (किरण वाजगे)

आग्रा ते रायगड अशी साहसी यात्रा म्हणजेच ‘गरुडझेप मोहिमेचं’ शिवजन्मभूमीतील नारायणगाव येथे पारंपरिक ढोल ताशा पथकांनी जल्लोषात स्वागत केले.छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला होता. क्षणार्धात सगळे वातावरण शिवमय होऊन गेले.

मुळशीचे शिवप्रेमी ऍड. मारुती गोळे यांनी १७ ऑगस्टपासून ‘आग्रा ते राजगड’ अशी गरुडझेप मोहीम आयोजित केली आहे. दिग्विजय जेधे या मोहिमेचे सहसंयोजक आहेत. या मोहीमेत सुमारे १ हजार १८२ युवक सहभागी झाले असून १३ दिवसांत तब्बल १ हजार ३०० किलोमीटर अंतर कापणारी ही साहसी मोहीम शुक्रवार (दि.२६ )रोजी सायंकाळी नारायणगावात पोहचली.

तब्बल ९९ दिवस म्हणजे ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ आग्रा येथे कैदेत काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि गनिमीकाव्याने औरंगजेबाची अभेद्य कैद भेदून राजगडाकडे, आपल्या महाराष्ट्राकडे प्रयाण केलं! हिंदुस्थानचा बादशहा म्हणवणाऱ्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सह्याद्रीचा हा वाघ आपल्या गडावर परत आला होता. तेव्हा रयतेला जो आनंद झाला असेल तो नक्कीच अवर्णनीय असेल.आज याच आग्रा सुटकेच्या आनंदाचा पुनःप्रत्यय या गरुडझेप मोहिमेने दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चेतवलेलं हे स्फुल्लिंग आज पुन्हा दिसलं.

या धाडसी मावळ्यांचं आज नारायणगावमध्ये दिमाखात आगमन झालं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सरपंच योगेश पाटे, तसेच जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, अमित बेनके, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, उपसरपंच आरिफ आतार, संतोष वाजगे, संतोष दांगट, तानाजी डेरे, रोहिदास केदारी, अतुल आहेर, गणेश वाजगे, नारायणगावातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शिवभक्तानी थाटामाटात, भव्य स्वरूपात या मावळ्यांचं उत्स्फूर्त स्वागत केले.

१७ ऑगस्ट २०२२ रोजी आग्र्याहून निघालेली ही मोहीम २९ ऑगस्ट २०२२ रोजी राजगडावर पोहचणार आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांचा नारायणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, व सरपंच योगेश पाटे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तब्बल बत्तीस वर्षांनी भरला, इयत्ता दहावीचा वर्ग

नारायणगाव : (किरण वाजगे)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सन १९९० या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा स्नेह मेळावा, नुकताच उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी प्राचार्य भिमराव बाणखेले सर यांनी भूषविले.

याप्रसंगी शिक्षक वृंद आदरणीय विठ्ठल कडू सर, विठ्ठल गारगोटे सर, बाळासाहेब खानदेशे सर, कुसुम काळे मॅडम, सुमन बेंडे मॅडम, इंदुमती बाणखेले मॅडम, सुप्रिया बावस्कर मॅडम उपस्थित होते.

या मेळाव्यास, विद्यार्थी देखील बहुसंख्येने उपस्थित होता. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, डॉक्टर्स, शिक्षक, क्लासवन अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.तब्बल ३२ वर्षानंतर आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यात काही विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करताना डोळे भरून आले

एवढ्या वर्षांनी अचानक सगळे मित्र एकत्र आल्याचा एक वेगळाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिक्षक सुध्धा आपल्या विद्यार्थ्यांना बघून भारावून गेले होते. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता केली.

या प्रसंगी सदानंद बुदगे, डॉ. हर्षद शेटे, डॉ.सलमान अली मिर्झा, प्राध्यापक शरद सोमवंशी, ललिता कडदेकर, पत्रकार अविनाश पवार, विश्वास थोरात, तहसीलदार राजेश कानसकर, प्रा. वैशाली खुडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील पोखरकर, रमेश खरमाळे, भाऊ निघोट, भास्कर सावंत, दिलीप महाजन, अनिल दैने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मुबीन मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार विकास सुपेकर यांनी मानले.

कवडीपाट ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंत पुणे सोलापूर महामार्गावरील रखडलेली कामे पूर्ण न झाल्यास तीन ते चार दिवसात आमरण उपोषण करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

कुरकुंभ: प्रतिनिधी, सुरेश बागल

कवडीपाट ते कासुडी॔ टोलनाक्यापर्यंत रस्त्यावरील अडचणी खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंजूर झाले आहे तरीही लवकरात लवकर त्या अडचणी पुर्ण कराव्यात अन्यथा तीन ते चार दिवसात आमरण उपोषण करणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे .

कवडीपाट टोलनाक्यापासून ते कासुडी॔ टोलनाका एक्स्प्रेस महामार्गाची दुरवस्था झाली आहे साईडपटयावर भरपूर प्रमाणात माती, वाळू साचणे – तसेच झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत, लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असणे, मधील दुभाजकाची उंची कमी होणे, रस्त्यावर मध्यभागी भरपूर प्रमाणात खड्डे पडणे, टोलनाक्यावर जड वाहने जाऊन डांबराची उंची कमी – जास्त झाली आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने साईडपटयावर माती साचलेल्या जागेवर भरपूर प्रमाणात चिखल झाला आहे त्यामुळे टू व्हीलर गाड्या घसरून १०-१२ मोठे अपघात होऊन जीवही गेलेला आहे तसेच काही जणांना अपंगत्व आले आहे व पाऊस उघडल्यावर मोठ्या गाड्या जाऊन भरपूर धुरळा उडत आहे त्यामुळे टु व्हीलर गाड्या वाल्यांच्या डोळ्यात भरपूर घाण जाऊन अपघात घडत आहेत.

तरीही खासदार, आमदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत नाहीतर असं नको व्हायला की फक्त बैठकीत घोषणा करण्यात येते पण प्रत्यक्षात काम १-२ वर्षे चालायचं तरी असं न होता लवकरात लवकर रस्त्यावरील अपघातजन्य त्रुटी आहेत त्या लवकरच दुर व्हाव्यात. असे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी म्हटले आहे.

खासदार डाॕ. अमोल कोल्हे यांनी पुणे- सोलापूर महामार्गाची केली पाहणी

उरुळी कांचन

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून पुणे सोलापूर महामार्गाची पाहणी करुन तातडीने कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. पुणे सोलापूर रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात व त्यामुळे होणारे नाहक मृत्यू याबाबत स्थानिक नागरिक व सोशल मीडिया वरून दररोज मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन व महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्यावर वस्तुनिष्ठ टीका केली जात होती.

चार दिवसापूर्वीच लोणी काळभोर येथील रेल्वे स्टेशन चौकामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू तसेच एका अल्पवयीन मुलाचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व टीका केली जात होती या गंभीर बाबीची दखल खासदार अमोल कोल्हे यांनी घेऊन आज हडपसर रवी दर्शन पासून ते लोणी टोलनाका कदमवाक वस्ती, लोणी रेल्वे स्टेशन, लोणी काळभोर फाटा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी ते उरुळी कांचन पर्यंत रस्त्याची पाहणी करुन निवेदन स्वीकारले अमोल कोल्हे यांनी संबंधित महामार्गाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. पुणे सोलापूर रोड व उरुळी कांचन येथील शिंदवणे चौकातील झालेली अतिक्रमणे स्वताःहुन काढावीत तसेच अतिक्रमणे काढण्याबाबत कोणीही राजकीय हस्तक्षेप करू नये असेही कोल्हे यांनी सांगितले. याबाबत पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश खासदार अमोल कोल्हे यांनी दिले असून कार्यवाही न झाल्यास स्वतः आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. यावेळी पाहणी दौऱ्यात संबंधित अधिकारी वर्ग तसेच आजी-माजी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, नागरिक, महिला, विद्यार्थी ,पत्रकार उपस्थित होते.

खासदार डाॕ.अमोल कोल्हे यांनी पुणे- सोलापूर महामार्गाची केली पाहणी

उरुळी कांचन

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून पुणे सोलापूर महामार्गाची पाहणी करुन तातडीने कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. पुणे सोलापूर रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात व त्यामुळे होणारे नाहक मृत्यू याबाबत स्थानिक नागरिक व सोशल मीडिया वरून दररोज मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन व महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्यावर वस्तुनिष्ठ टीका केली जात होती.

चार दिवसापूर्वीच लोणी काळभोर येथील रेल्वे स्टेशन चौकामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू तसेच एका अल्पवयीन मुलाचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व टीका केली जात होती या गंभीर बाबीची दखल खासदार अमोल कोल्हे यांनी घेऊन आज हडपसर रवी दर्शन पासून ते लोणी टोलनाका कदमवाक वस्ती, लोणी रेल्वे स्टेशन, लोणी काळभोर फाटा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी ते उरुळी कांचन पर्यंत रस्त्याची पाहणी करुन निवेदन स्वीकारले अमोल कोल्हे यांनी संबंधित महामार्गाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. पुणे सोलापूर रोड व उरुळी कांचन येथील शिंदवणे चौकातील झालेली अतिक्रमणे स्वताःहुन काढावीत तसेच अतिक्रमणे काढण्याबाबत कोणीही राजकीय हस्तक्षेप करू नये असेही कोल्हे यांनी सांगितले. याबाबत पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश खासदार अमोल कोल्हे यांनी दिले असून कार्यवाही न झाल्यास स्वतः आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. यावेळी पाहणी दौऱ्यात संबंधित अधिकारी वर्ग तसेच आजी-माजी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, नागरिक, महिला, विद्यार्थी ,पत्रकार उपस्थित होते.