तब्बल बत्तीस वर्षांनी भरला, इयत्ता दहावीचा वर्ग

नारायणगाव : (किरण वाजगे)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सन १९९० या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा स्नेह मेळावा, नुकताच उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी प्राचार्य भिमराव बाणखेले सर यांनी भूषविले.

याप्रसंगी शिक्षक वृंद आदरणीय विठ्ठल कडू सर, विठ्ठल गारगोटे सर, बाळासाहेब खानदेशे सर, कुसुम काळे मॅडम, सुमन बेंडे मॅडम, इंदुमती बाणखेले मॅडम, सुप्रिया बावस्कर मॅडम उपस्थित होते.

या मेळाव्यास, विद्यार्थी देखील बहुसंख्येने उपस्थित होता. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, डॉक्टर्स, शिक्षक, क्लासवन अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.तब्बल ३२ वर्षानंतर आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यात काही विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करताना डोळे भरून आले

एवढ्या वर्षांनी अचानक सगळे मित्र एकत्र आल्याचा एक वेगळाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिक्षक सुध्धा आपल्या विद्यार्थ्यांना बघून भारावून गेले होते. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता केली.

या प्रसंगी सदानंद बुदगे, डॉ. हर्षद शेटे, डॉ.सलमान अली मिर्झा, प्राध्यापक शरद सोमवंशी, ललिता कडदेकर, पत्रकार अविनाश पवार, विश्वास थोरात, तहसीलदार राजेश कानसकर, प्रा. वैशाली खुडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील पोखरकर, रमेश खरमाळे, भाऊ निघोट, भास्कर सावंत, दिलीप महाजन, अनिल दैने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मुबीन मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार विकास सुपेकर यांनी मानले.

Previous articleकवडीपाट ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंत पुणे सोलापूर महामार्गावरील रखडलेली कामे पूर्ण न झाल्यास तीन ते चार दिवसात आमरण उपोषण करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे
Next articleगरुडझेप मोहिमेचं’ शिवजन्मभूमीत जल्लोषात स्वागत