Home Blog Page 83

केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांना भारतीय मजदूर संघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन

कुरकुंभ : सुरेश बागल

कोरोना परिस्थिती नंतर काही ऊद्योग व कामगार क्षेत्रातील परिस्थिती आव्हानात्मक निर्माण झाली आहे. काम व वेतनातील अस्थिरते मुळे कामगार क्षेत्रात भिती चे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या परिस्थितीत मा. केंद्रीय श्रममंत्री चे श्री भूपेंद्र यादव यांची स्वावलंबी भारत अभियान my SBA PORTAL ऊद्घाटन कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने पुणे येथे भेट घेऊन निवेदन दिले.
तसेच कामगारांचे खालील महत्वपूर्ण प्रश्न आव्हाने करिता संघटनेचे पदाधिकारी समावेत मिटींग ची मागणी केली आहे.

१) मुंबई औद्योगिक न्यायालयातील न्यायाधीशींची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. त्यामुळे गतीशिल न्याय प्रक्रिया होईल. व न्याय मिळेल. मुंबई औद्योगिक न्यायालयात दोन न्यायधिशांची पदे रिक्त आहेत. त्यातील एक पद ४ वर्षापासून व एक पद २ वर्षापासूनरिक्त आहेत.

२) असंघीटत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना तयार करून लागु करण्यात यावी.
३) कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी . तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात कामाच्या अनुभवा नुसार वाढ करण्यात यावी व झालेल्या कामाची ग्रजुईटी देण्यात यावी.
४) भारतीय मजदूर संघाने लेबर कोड नियम, या बाबतीत घेतलेल्या हरकती व सुचनांचा बाबतीत भारतीय मजदूर संघाच्या समावेत त्रिपक्षीय चर्चा आयोजित करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा.

यावेळी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अनिल ढुमणे, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, असंघीटत प्रभारी उमेश विस्वाद, पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, मुंबई अध्यक्ष बापू दडस,प्रदेश सहसचिव राधेश्याम कुलकर्णी, शासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विवेक ठकार , भामसंघाचे संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, हिंदुस्थान अॅन्टोबायटीस्स कंपनीतील संघटनेचे सेक्रेटरी विजय पाटील उपस्थित होते.

कल्प फिटनेस क्लबच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बापूसाहेब सोनवणे

चाकण- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त कडाची वाडी या ठिकाणी कल्प फिटनेस क्लब आणि स्वयंम्भू योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कल्प फिटनेसच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते . शिबिराचे उदघाटन चाकण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर , KFC चे डायरेक्टर संदीप मेदनकर, अमित दरेकर आणि ट्रेनर प्रमोद खामकर आणि स्वयंम्भू चे योगगुरू बापूसाहेब सोनवणे यांच्या उपस्थितीत झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर आणि योगगुरू बापूसाहेब सोनवणे आणि योगा विद्यार्थिनी सुनीता घुमरे यांच्या रक्तदानाने उद्घाटने या शिबीराची सुरवात झाली.या शिबिरात 120 सदस्यांनी रक्तदान केले .

या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा पेलणारे KFC चे संस्थापक आणि गोड गळ्याचे गायक संदीप मेदनकर,अमित दरेकर आणि प्रमोद खामकर व कल्पचे ट्रेनर निकिता मॅडम,रमेश सर,पवन सर यांनी सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.जिम तर्फे सर्वांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था केली होती…कल्प फिटनेस क्लब मध्ये गायन,वादन,कराटे,झूमबा,पर्सनल कोच,आहार मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवले जातात.

या कार्यक्रमासाठी श्वास हॉस्पिटल चे सर्वेसर्वा अजिंक्य दरेकर,विस्तार अधिकारी बेबी दरेकर ,उद्योजक कालिदास मेदनकर,नगरसेवक महेश शेवकरी,रामदास धनवटे,f2 फिटनेस चे सर्वेसर्वा बनेश्वर कड, राजगुरूनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राहुल तांबे,मयूर मोहिते,अशोक खांडेभराड,दत्तात्रय कौटकर ,नगरसेवक विशाल नायकवडी,सागर बनकर,सचिन मांजरे,गणेश बोत्रे,रवी चव्हाण, आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते

भवरापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय साठे यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

युवा उद्योजक संजय सदाशिव साठे यांची भवरापूर (ता.हवेली) तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भवरापूर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता त्यामध्ये मा पं स सदस्य धंनजय साठे यांनी यांनी संजय साठे यांचे नाव सुचविले व संपूर्ण ग्रामसभेने त्यांना एकमताने अनुमोदन दिले व त्यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी भवरापूरचे सरपंच सचिन सातव, मा सरपंच बबन साठे, मा सरपंच सुभाष साठे, चेअरमन अशोक साठे, मा उपसरपंच दिलीप साठे, ग्रा स संभाजी साठे, मा उपसरपंच वनिता साठे, ग्रा सदस्य योगश साठे, जानकुबाई सातव, शकुंतला टिळेकर, ग्रामसेवक भारती ताम्हाणे, मा तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव साठे, शिवाजी साठे, विनोद साठे, नंदकुमार टिळेकर, पोलिस पाटील चंद्रकांत टिळेकर, शरद चौधरी, गणेश साठे, महेश साठे, सौरभ साठे, अभिषेक साठे, बाळासाहेब साठे, संदिप साठे, अंकुश साठे, केशव साठे, गणेश सातव, कैलास साठे, रवींद्र साठे, संभाजी कार्हाळे, निलेश गायकवाड, बजरंग गायकवाड, रूपाली चौधरी, गौरव साठे, तेजस साठे आदी उपस्थित होते.

नारायणगावात दहीहंडीचा थरार उत्साहात

नारायणगाव : (किरण वाजगे)

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नारायणगावात ठीक ठिकाणी दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.नारायणगाव येथील विक्रांत क्रीडा मंडळ, विरोबा मित्र मंडळ, भाजी बाजार मित्र मंडळ , लक्ष्मीनारायण मित्र मंडळ, हनुमान चौक मित्र मंडळ, शिव विहार मित्र मंडळ, विटे कोराळे मित्र मंडळ तसेच गावात ठिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.आमदार अतुल बेनके युवा मंच, राष्ट्रवादी काँग्रेस नारायणगावच्या वतीने देखील नारायणगावातील जीवन मेडिकल समोर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ८ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता,बजरंग दल मंचर या गोविंद पथकाने सात थरांची सलामी देऊन दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.

दहीहंडी उत्सवात चैतन्य गोंविदा पथक, होळी चौक, ओतुर, नवोदित गोविंदा पथक, वरली आळी, ओतुर,५२ स्वर गोंविदा पथक, ओतूर, बजरंग दल, मंचर (धर्मवार स्वं. शेखर अण्णा बाणखेले), क्रांती गोंविदा पथक, घाटकोपर, मुंबई, वायाळ मळा माऊली ग्रुप, अवसरी (आंबेगाव), जयमल्हार गोंविदा पथक, ओतुर श्री. पंचलिंग गोविंदा पथक शिवनेरी, जुन्नर या गोविंदा पथकांचा समावेश होता. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ह्या या दहीहंडी उत्सवाच्या प्रमुख आकर्षण होत्या.दहीहंडीचा उत्सव बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. या दहीहंडीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले.

याप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, गुलाब नेहरकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, विकास दरेकर, राजश्री बोरकर, पुष्पा जाधव, सुजाता डोंगरे, ज्योती संते, कैलास पानसरे, बबन खैरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बेल्हेकर, मंगेश फाकटकर यांनी तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांनी आभार मानले.

खुटबावच्या विद्यार्थ्याचे कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश

योगेश राऊत , पाटस

साई मल्हार कराटे डो-असोसिएशन ऑफ इंडिया आणि साई मल्हार इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव चौफुला या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी पुणेसह लातूर, परभणी, अहमदनगर ,सातारा, रायगड ,सांगली, कोल्हापूर सोलापूर या ठिकाणचे एकूण 375 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रा. कैलास महानोर यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
सुवर्ण पदक
१) प्रतीक भाऊ जाधव
२) कुणाल ज्ञानेश्र्वर ढोले
३) गौरी गणेश चांदगुडे
४) विराज गणेश जाधव
५) शुभम बंडू शेलार
६) विराज गणेश जाधव

रौप्य पदक
१) रोहन रवींद्र गिरमे
२) प्रणिती रामदास थोरात
३) शिवराज भानुदास थोरात
४) श्रेया ज्ञानेश्वर मदने
५) सारंग सागर शेळके

कास्य पदक
१) शिवम ज्ञानेश्वर शेलार
२)रोहन विलास जाधव
३) प्रथमेश विष्णू जाधव
४) वैभव हरिभाऊ थोरात
५) सोहन सचिन थोरात
६) तन्वी प्रकाश म्हेत्रे
७) भाग्यश्री खंडेराव मांढरे
८) सिद्धी अनिल ढवळे
९)श्रेयस शिशिर दोरगे
१०) श्रेयस महेंद्र गिरमे
११) ओमकार सुखदेव कदम
१२) प्रांजल विकास जाधव

या खेळाडूंचे अभिनंदन स्कूलचे मुख्यध्यापक पुष्कराज मोरे सर व शिक्षक वर्ग यानी केले. तसेच या कराटे खेळाडूंना श्री.स्वप्निल भागवतसर व प्रा. कैलास महानोर यांचे मार्गदर्शन लाभले

राज्यस्तरीय फायर आर्म कॉम्पिटीशन स्पर्धेत मावळातील ग्रामीण भागातील स्पर्धकांचे विशेष गुण संपन्न

श्रावणी कामत , लोणावळा

वरळी मुंबई येथे ऑगस्ट 19 ते 21 महाराष्ट्र राज्य राज्यस्तर फायर आर्म कॉम्पिटिशन स्पर्धा पार पडल्या यामध्ये 50 मीटर प्रोन प्रकार मध्ये नेमबाजी मध्ये मावळातील तीन जणांनी मोठे यश संपादन केले.

50 मीटर रायफल प्रकारात ऊर्से येथील नवनित विकास ठाकुर याने ज्युनिअर गटामध्ये 600 पैकी 507 गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला. तसेच अडले बुद्रुक येथील सार्थक बाळासाहेब घोटकुले व उत्कर्ष सोनी या मावळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी निषेश गुण संपादन करुन अहमदाबाद गुजरात येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी. व्ही. माळवणकर या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रशिक्षक राज दाभाडे आणि स्नेहल पाटील यांच्या प्रशिक्षणाखाली बालेवाडी श्री शिव छत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्स प्रशिक्षण घेत असून गुणसंपादन केले आहे. यांना आई वडील आणि शाळेचे मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील मुलांनी रायफल फायर या अनोख्या व शहरी क्रीडा प्रकारात यश संपादन करुन मावळचे व आपल्या गावचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कैतुक होतं आहे.

किसान सभाचे पुणे जिल्ह्याचे अधिवेशन बुधवारी होणार घोडेगावला:शेतकरी नेते, डॉ.अजित नवले राहणार उपस्थित

घोडेगाव

संपूर्ण देशभर असलेल्या,अखिल भारतीय किसान सभा या राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी, शेतमजुर हिताचे काम आहे.सद्यस्थितीत राज्यभर जिल्हानिहाय किसान सभेची अधिवेशन सुरू आहेत.

पुणे जिल्हा किसान सभा समितीचे, नववे जिल्हा अधिगवेशन,येत्या बुधवारी घोडेगाव ता.आंबेगाव येथे पार पडत आहे.

या अधिवेशनात मागील तीन वर्षात, संघटनेने केलेल्या शेतकरी व श्रमिक वर्गासाठीच्या कामाचा अहवाल मांडून त्यावर चर्चा होईल तसेच पुढील काळात कोणत्या प्रश्नावर काम करायचे याबाबत दिशा निश्चित केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहे.या अधिवेशनाचे उद्घाटक अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष कॉ.किसन गुजर हे करणार आहे.तर प्रमुख उपस्थिती म्हणून,

कॉ.अजित अभ्यंकर (जेष्ठ कामगार नेते)कॉ.उमेश देशमुख (खजिनदार,अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य)को.गणेश दराडे (माकपा,पुणे जिल्हा सचिव)हे असणार आहेत.

या अधिवेशनाचा समारोप शेतकरी नेते व अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य समितीचे सरचिटणीस डॉ.अजित नवले हे करणार आहेत.

सदरील अधिवेशनाचे संयोजन पुणे जिल्हा समितिचे अध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे,सचिव डॉ.अमोल वाघमारे, व जिल्हा समिती सदस्य अशोक पेकारी,राजू घोडे,विश्वनाथ निगळे, लक्ष्मण जोशी,महेंद्र थोरात,अमोद गरुड,संतोष कांबळे,इ.करत आहे.

उरुळी कांचन-डॅा.मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना स्टिकचे वाटप

उरुळी कांचन

डॅा.मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन उरुळी कांचन मधील जेष्ठ नागरिक संघातील सभासदांना स्टिक ( काठी ) चे वाटप करण्यात आले.

यावेळी मा.सरपंच माऊली नाना कांचन, जेष्ठ डॅा.पदवाड , महादेव भ.कांचन, ग्रा.पं.सदस्य सुनिल तांबे तसेच सर्व जेष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित होते.

यावेळी डॅा.पदवाड यांनी मनोगत व्यक्त करताना बांपुचे कौतुक केले, नेहमी राजेंद्र बापु हे आपल्याला मदत करत असतात. मागे देखील त्यांनी छत्री, बॅग इतर साहित्य दिले होते. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल बापुंचे ऋण व्यक्त केले.

उरुळी कांचनमध्ये ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

उरुळी कांचन

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आपण रक्तदान करुन एखाद्या गरजवंतांची गरज पुर्ण करु शकाल. हे महादान करुन पुण्य पदरात पाडुन घेऊ या. ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने सातत्याने समाजोपयोगी विधायक स्तुत्य उपक्रम राबविले जात असल्याचे असे मत जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन यांनी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक तुळशीचे रोप, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन प्रत्येक रक्तदात्यांना योग्य प्रकारे सन्मानित करण्यात आले.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, पु.जि.नि.स.सदस्य संतोष कांचन, मा.सरपंच संतोष कांचन, ग्रा.प. सदस्य अमित कांचन, सुनिल तांबे, प्राचार्य भारत भोसले, युवा नेते सुभाष बगाडे, पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, दै.सकाळ पत्रकार सुवर्णा कांचन, दै.लोकमत पत्रकार सचिन माथेफोड, भाजपचे शहर अध्यक्ष अमित कांचन, मा.उपसरपंच युवराज कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अंलकार कांचन आदी उपस्थित होते.

ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचे आयोजक संतोष चौधरी, अजिंक्य कांचन, शांताराम चौधरी, किरण वांजे, महादेव काकडे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे, आशुतोष तुपे, धनाजी ढावरे, आदी गुप्र सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महालक्ष्मी एव्हीएशनच्यावतीने मोफत हवाई सफर

योगेश राऊत पाटस

श्री महालक्ष्मी एव्हीएशन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन उद्योजक श्री दत्तात्रय गोते पाटील यांच्या नविन हेलिकॉप्टरचे पूजन कानगाव (ता. दौंड ) येथील हेलिपॅडवर महंत लक्ष्मणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात विरधवल जगदाळे आप्पासाहेब पवार सत्वशील शितोळे नानासाहेब फडके
राहुल दिवेकर सभापती हेमलता फडके कानगांव सोसायटीचे मा चेअरमन दत्तात्रय रामचंद्र फडके आप्पासाहेब कोऱ्हाळे अँड अशोक फडके महादेव चौधरी रामदास पवार ज्ञानेश्वर शेळके राहुल चाबुकस्वार रमेश जाधव
संपत फडके मारुती कोऱ्हाळे नवनाथ थोरात मनिषा नवले अंकुश गवळी गजानन गुणवरे हनुमंत गवळी संदिप नवले पांडुरंग फडके ज्ञानेश्वर फडके प्रदिप फडके संतोष गवळी संभाजी फडके पिंटु चौडकर तसेच दौंड तालुक्यातील अनेक गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच पोलिस पाटील व पत्रकार हे मान्यवर उपस्थित हाेते.

यावेळी जवळपास नव्वद नागरीकांना हेलिकॉप्टरची मोफत हवाई सफर महालक्ष्मी एव्हिएशन यांच्यातर्फे देण्यात आली
अशी माहीती अँड संदिप दत्तात्रय फडके यांनी दिली