नारायणगावात दहीहंडीचा थरार उत्साहात

नारायणगाव : (किरण वाजगे)

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नारायणगावात ठीक ठिकाणी दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.नारायणगाव येथील विक्रांत क्रीडा मंडळ, विरोबा मित्र मंडळ, भाजी बाजार मित्र मंडळ , लक्ष्मीनारायण मित्र मंडळ, हनुमान चौक मित्र मंडळ, शिव विहार मित्र मंडळ, विटे कोराळे मित्र मंडळ तसेच गावात ठिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.आमदार अतुल बेनके युवा मंच, राष्ट्रवादी काँग्रेस नारायणगावच्या वतीने देखील नारायणगावातील जीवन मेडिकल समोर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ८ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता,बजरंग दल मंचर या गोविंद पथकाने सात थरांची सलामी देऊन दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.

दहीहंडी उत्सवात चैतन्य गोंविदा पथक, होळी चौक, ओतुर, नवोदित गोविंदा पथक, वरली आळी, ओतुर,५२ स्वर गोंविदा पथक, ओतूर, बजरंग दल, मंचर (धर्मवार स्वं. शेखर अण्णा बाणखेले), क्रांती गोंविदा पथक, घाटकोपर, मुंबई, वायाळ मळा माऊली ग्रुप, अवसरी (आंबेगाव), जयमल्हार गोंविदा पथक, ओतुर श्री. पंचलिंग गोविंदा पथक शिवनेरी, जुन्नर या गोविंदा पथकांचा समावेश होता. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ह्या या दहीहंडी उत्सवाच्या प्रमुख आकर्षण होत्या.दहीहंडीचा उत्सव बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. या दहीहंडीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले.

याप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, गुलाब नेहरकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, विकास दरेकर, राजश्री बोरकर, पुष्पा जाधव, सुजाता डोंगरे, ज्योती संते, कैलास पानसरे, बबन खैरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बेल्हेकर, मंगेश फाकटकर यांनी तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांनी आभार मानले.

Previous articleखुटबावच्या विद्यार्थ्याचे कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश
Next articleभवरापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय साठे यांची बिनविरोध निवड