भवरापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय साठे यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

युवा उद्योजक संजय सदाशिव साठे यांची भवरापूर (ता.हवेली) तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भवरापूर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता त्यामध्ये मा पं स सदस्य धंनजय साठे यांनी यांनी संजय साठे यांचे नाव सुचविले व संपूर्ण ग्रामसभेने त्यांना एकमताने अनुमोदन दिले व त्यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी भवरापूरचे सरपंच सचिन सातव, मा सरपंच बबन साठे, मा सरपंच सुभाष साठे, चेअरमन अशोक साठे, मा उपसरपंच दिलीप साठे, ग्रा स संभाजी साठे, मा उपसरपंच वनिता साठे, ग्रा सदस्य योगश साठे, जानकुबाई सातव, शकुंतला टिळेकर, ग्रामसेवक भारती ताम्हाणे, मा तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव साठे, शिवाजी साठे, विनोद साठे, नंदकुमार टिळेकर, पोलिस पाटील चंद्रकांत टिळेकर, शरद चौधरी, गणेश साठे, महेश साठे, सौरभ साठे, अभिषेक साठे, बाळासाहेब साठे, संदिप साठे, अंकुश साठे, केशव साठे, गणेश सातव, कैलास साठे, रवींद्र साठे, संभाजी कार्हाळे, निलेश गायकवाड, बजरंग गायकवाड, रूपाली चौधरी, गौरव साठे, तेजस साठे आदी उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात दहीहंडीचा थरार उत्साहात
Next articleकल्प फिटनेस क्लबच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन