कल्प फिटनेस क्लबच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बापूसाहेब सोनवणे

चाकण- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त कडाची वाडी या ठिकाणी कल्प फिटनेस क्लब आणि स्वयंम्भू योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कल्प फिटनेसच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते . शिबिराचे उदघाटन चाकण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर , KFC चे डायरेक्टर संदीप मेदनकर, अमित दरेकर आणि ट्रेनर प्रमोद खामकर आणि स्वयंम्भू चे योगगुरू बापूसाहेब सोनवणे यांच्या उपस्थितीत झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर आणि योगगुरू बापूसाहेब सोनवणे आणि योगा विद्यार्थिनी सुनीता घुमरे यांच्या रक्तदानाने उद्घाटने या शिबीराची सुरवात झाली.या शिबिरात 120 सदस्यांनी रक्तदान केले .

या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा पेलणारे KFC चे संस्थापक आणि गोड गळ्याचे गायक संदीप मेदनकर,अमित दरेकर आणि प्रमोद खामकर व कल्पचे ट्रेनर निकिता मॅडम,रमेश सर,पवन सर यांनी सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.जिम तर्फे सर्वांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था केली होती…कल्प फिटनेस क्लब मध्ये गायन,वादन,कराटे,झूमबा,पर्सनल कोच,आहार मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवले जातात.

या कार्यक्रमासाठी श्वास हॉस्पिटल चे सर्वेसर्वा अजिंक्य दरेकर,विस्तार अधिकारी बेबी दरेकर ,उद्योजक कालिदास मेदनकर,नगरसेवक महेश शेवकरी,रामदास धनवटे,f2 फिटनेस चे सर्वेसर्वा बनेश्वर कड, राजगुरूनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राहुल तांबे,मयूर मोहिते,अशोक खांडेभराड,दत्तात्रय कौटकर ,नगरसेवक विशाल नायकवडी,सागर बनकर,सचिन मांजरे,गणेश बोत्रे,रवी चव्हाण, आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते

Previous articleभवरापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय साठे यांची बिनविरोध निवड
Next articleकेंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांना भारतीय मजदूर संघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन