Home Blog Page 84

चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र भुलेश्वर येथे मराठा महासंघाच्या वतीने बेलांच्या झाडांचे वृक्षारोपण

उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा, भवानीशंकर सोशल फाउंडेशन, पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे चौथ्या श्रावणी सोमवार निमीत्ताने २५ बेलाची झाडे गडावर मंदिर परिसरामध्ये लावण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न इतिहास संशोधन मंडळ प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, व साहित्यिक लेखक दशरथ यादव, पुरंदर तालुका इतिहास संशोधन मंडळ अध्यक्ष अमित पवार हे उपस्थित होते.
दौंड तालुका मराठा महासंघ उद्योग व्यापार आघाडीचे अध्यक्ष सुरज चोरगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडांचे सौजन्य देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, जिल्हा युवक अध्यक्ष मयूरआबा सोळसकर, उद्योग व्यापारी आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, वकील आघाडी अध्यक्ष अजित दोरगे, विद्यार्थी अध्यक्ष समीर लोहकरे, युवक कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, उद्योग व्यापार आघाडी सचिव चंद्रकांत आहेरकर, दौंड तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोहिणीताई दोरगे, विद्यार्थी सचिव सुरज आखाडे, हवेली तालुका अध्यक्ष अतुल मोरे, दौंड तालुका बहुजन आघाडी उपाध्यक्ष रोहित कांबळे, हवेली तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष कुंदन कुंजीर, पुरंदरचे पदाधिकारी एकनाथ खेडेकर, योगेश मोकाशी, पाटस मराठा महासंघाचे बाबा कड, देवस्थानचे पुजारी विनय गुरव हे होते.

दर श्रावण सोमवारी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भांडगाव येथील सौ.रोहिणीताई लक्ष्‍मण दोरगे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी दौंड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांना तुळशी रोपांचे वाटप, दुसरा श्रावणी सोमवार निमीत्ताने भाविकांना फराळ चिवडा वाटप, तिसऱ्या सोमवार निमित्ताने पोलीस पत्रकार बांधव यांच्या सोबत रक्षाबंधन व चिक्की वाटप, तर आज चौथ्या श्रावणी सोमवार निमीत्ताने बेलांचे वृक्षारोपण करण्यात आले. विविध उपक्रमाचे हे भुलेश्वर येथील सहावे वर्ष आहे. असे यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी सांगितले.

महात्मा गांधी विद्यालयाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षानी घेतला मेळावा : शिक्षकांनी केले मार्गदर्शन

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला मेळावा दोन वर्षांनंतर शिक्षक व विद्यार्थी सोबत आले होते.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी आपली उपस्थिती दाखवली.

त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी
शिक्षकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयश अंकुश बारस्कर व ज्ञानेश्वरी अनिल निगडे यांनी केले.

कलागुण , शैक्षणिक गोष्टींवर सर्व विद्यार्थ्यांनी चर्चा केली. व चालू शैक्षणिक घडामोडीवर शिक्षकांची चर्चा व सल्ला घेतला.
सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना उमेश कसबे सर यांनी भविष्यातील वाटचालीस योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कु.जय विकास टिळेकर व कु.आदित्य सुरेश वाळेकर यांनी केले होते. कार्यक्रमाला आलेल्या सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कु. रोहन देविदास ताम्हणे यांनी सर्वांचे आभार मानले.

भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे पुणे येथे स्वागत

कुरकुंभ ,सुरेश बागल

कोरोना परिस्थिती नंतर काही ऊद्योग व कामगार क्षेत्रातील परिस्थिती आव्हानात्मक निर्माण झाली आहे. काम व वेतनातील अस्थिरते मुळे कामगार क्षेत्रात भिती चे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य चे श्री सुरेश खाडे यांची भारतीय मजदूर संघाच्याे शिष्टमंडळाने पुणे येथे भेट घेऊन मा कामगार मंत्री यांचे स्वागत व अभिनंदन केले.
तसेच कामगारांचे खालील महत्वपूर्ण प्रश्न आव्हाने करिता संघटनेचे पदाधिकारी समावेत मिटींग ची मागणी केली आहे.

१) असंघीटत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना तयार करून लागु करण्यात यावी.

२) कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात कामाच्या अनुभवा नुसार वाढ करण्यात यावी व झालेल्या कामाची ग्रजुईटी देण्यात यावी.

३) महाराष्ट्र शासनाने किमान वेतन कायद्यानुसार १७ / १८ शेल्डुल ऊद्योगातील कामगारांचे कायद्यानुसार ५ वर्षापूर्वी पुर्ननिर्धारण करणे कायदेशीर बंधनकारक होते. पण या ऊद्योगातील किमान वेतनची मुदत संपुनही ७ ते ८ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. शासनाने अंमलबजावणी केली नाही त्यामुळे कामगारांना कमी वेतन मिळत आहे. तरी किमान वेतन कायद्यानुसार नुसार पुनःनिर्धारण करून फरका सहित रक्कम कामगारांना मिळावी.
४) महाराष्ट्र शासनाने सर्व कामगारांना ई ऐस आय व पी फ योजना लागु करून कामगारांचे अंशदान रक्कम महाराष्ट्र शासनाने भरावे.
५) भारतीय मजदूर संघाने लेबर कोड नियम, या बाबतीत घेतलेल्या हरकती व सुचनांचा बाबतीत भारतीय मजदूर संघाच्या समावेत त्रिपक्षीय चर्चा आयोजित करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा.

यावेळी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात भारतीय संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, असंघीटत प्रभारी उमेश विस्वाद, पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, मुंबई अध्यक्ष बापू दडस, शासकीय कर्मचारी संघटनेचे राधेश्याम कुलकर्णी, विवेक ठकार , श्रीपाद कुटासकर, हिंदुस्थान अॅन्टोबायटीस्स कंपनीतील संघटनेचे सेक्रेटरी विजय पाटील उपस्थित होते.

नारायणगावात कॅफे अल्पवयीन मुला-मुली़चे अश्लील चाळे;कॅफे चालकांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

कॅफे हाऊस मध्ये मुला- मुलींचे असभ्यवर्तन व अश्लील चाळे चालू असताना नारायणगाव पोलिसांनी दोन कॅफे मालकांवर कारवाई केली आहे. सुवर्णा श्रीकांत गडगे व अपेक्षा बाजीराव टाव्हरे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारूळवाडीतील कॉलेज रोड वरील मूनलाईट कॅफे हाऊसचे मालक विशाल संदीप पवार (वय २० वर्ष) राहणार पाटे खैरे मळा, नारायणगाव) व कॅफे क्रीमचे मालक समर्थ कालिदास सरोदे (वय २१, राहणार खोडदरोड, नारायणगाव) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जुन्नर शहरात दोन दिवसांपूर्वी एका कँफेवर केलेल्या कारवाई नंतर नारायणगावात पोलिसांनी ही कारवाई। केली आहे.
मूनलाईट कॅफे हाऊस मध्ये मुला मुलींना एकांतात बसण्यासाठी पडद्यांचे पार्टिशन करून बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. त्या ठिकाणी असभ्य वर्तन व अश्लील चाळे चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. नारायणगाव मध्ये काही कॅफे हाऊस मध्ये मुला मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु त्याकडे पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. पालकांनी आपल्या मुलींची काळजी घेणे गरजेचे आहे.

कॅफे हाऊस मध्ये अनेक मुलं-मुली दोन दोन तास बसलेले आढळून येतात. खरंतर पालकांनी आपल्या मुले व मुली शिक्षणासाठी कॉलेजला उपस्थित असतात का? याची माहिती नसते. परंतु पालकांनी आपल्या मुलांवर व मुलींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी कॉलेजमध्ये जाऊन उपस्थिती बघणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील प्राचार्यांनीही याबाबतीत लक्ष ठेवून सातत्याने गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करणे आवश्यक आहे. कॉलेजमधील अनेक मुलं-मुली कॅफे हाऊस मध्ये गेल्यानंतर आपल्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलून अनेक वेळ बसून असतात. त्यासाठी कॅफे मालकांनी पडदे लावून व्यवस्था केलेली आढळून येते. पोलिसांनी कॅफे हाऊस वर छापे घातले तर कॅफे हाऊस मध्ये चालणाऱ्या असभ्य वर्तन व अश्लील चाळ्यांना जरब बसेल. याबाबत ठोस कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.

अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन कडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

उरुळी कांचन

अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित, महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, डॉ. अस्मिता प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डॉ. अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मेडिअम स्कुल, प्रतिभाताई स्कुल ऑफ नर्सिंग, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात प्रभात फेरी, राष्ट्रीय गीत, मानवंदना, सामूहिक कवायत, नृत्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तराखंड चे राज्य पोलिस महानिरीक्षक आनंत शंकर ताकवले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव डॉ. अजिंक्य कांचन, ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा अजिंक्य कांचन, अक्षय महाजन, मिलिंद महाजन, उमेश शाह, सावता वाघमारे, शामशेठ शेंडे, अस्मिता बहिरट, रत्नप्रभादेवी भोर, आप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन कडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

उरुळी कांचन

अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित, महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, डॉ. अस्मिता प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डॉ. अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मेडिअम स्कुल, प्रतिभाताई स्कुल ऑफ नर्सिंग, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात प्रभात फेरी, राष्ट्रीय गीत, मानवंदना, सामूहिक कवायत, नृत्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तराखंड चे राज्य पोलिस महानिरीक्षक आनंत शंकर ताकवले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव डॉ. अजिंक्य कांचन,ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा अजिंक्य कांचन,अक्षय महाजन, मिलिंद महाजन, उमेश शाह, सावता वाघमारे, शामशेठ शेंडे, अस्मिता बहिरट, रत्नप्रभादेवी भोर, आप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव

राजगुरूनगर- शालेय विद्यार्थ्यांन मध्ये भारतीय सणांविषयी, परंपरांविषयी, संस्कृती विषयी माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच विविध मूल्यांचा विकास व्हावा,आनंद प्राप्ती साठी,स्वच्छंदतेचा विकास व्हावा यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम.सारिका राक्षे मॅडम यांनी गोकुळाष्टमी/श्रीकृष्ण जन्मदिवस कधी साजरा केला जातो. या विषयी माहिती दिली. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या दिवशी कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. त्याला गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस म्हणून संबोधण्यात येते.

शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. अंजली शितोळे मॅडम यांनी श्रीकृष्ण जन्माची कथा सांगितली. श्री कृष्णाची विविध रूपे, गोकुळात मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा, राधेवर निस्वार्थ प्रेम करणारा मुरलीधर, सुदामा यांनी प्रेमाने आणलेले पोहे खाणारा, अर्जुनाला गीतेच्या रुपाने सर्वव्यापी ज्ञान देणारा युगंधर या विषयी माहिती दिली.
शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शुभांगी जाधव मॅडम यांनी श्रीकृष्णाच्या नाना क्रिडा प्रकारांविषयी माहीती दिली.

पशुमागे धावणे,गोपीकांकडे दही मागणे,न दिल्यास दगड मारून माठ फोडणे,वासरांना मोकळे सोडून मनोसोक्त दुग्धपण करून देणे, दही दूध बाजारात विकायला नेण्या अगोदर गवळयांच्या पोरांना मनोसोक्त खाऊ घालणे इत्यादी.
शाळेमध्ये छोटीशी दहीहंडी,दुध, दही,ताक, लाह्या,भाजलेली डाळ, साखर, लोणचे,फळांच्या फोडी या पासून तयार करण्यात आली.गोपाळ काल्याची दहीहंडी उंचावर बांधण्यात आली. आली.तेथे मानवी मनोरा करून गोविंदांचा हा साहसी खेळ खेळण्यात आला.यामध्ये विद्यार्थी गोविंदा आला रे,आला,आ गया माखन चोर,गोविंदा रे गोपाळा,गोकुळात आनंद झाला,चांदी की डाल पर सोने का मोर.अशा घोषणा देत होते.या कार्यक्रमात श्रीकृष्ण, राधा,गोपिका,पेंदया, सुदामा आणी बालगोपाळ अवतरले होते.
दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना काल्याचा प्रसाद देण्यात आला.

या दहीहंडी सारख्या साहसी खेळांमधून आपल्याला एकीचे बळ,सहनशीलता,संघर्ष, विश्वास, अनुभव, एकाग्रता, जिद्द, लक्ष्य या गोष्टींचे जीवन जगत असतानाचे महत्वपूर्ण ज्ञान मिळते असे शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर यांनी सांगितले.

या नंतर शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम.सारिका राक्षे मॅडम यांनी सांगितले की कृष्णाला जीवनात बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत.त्यांचे आई वडिल लगेच वेगळे झाले,नंद, यशोदा भेटले,पण आयुष्यातून तेही गेले,राधा गेली,गोकुळ गेल,मथुरा गेली, आयुष्यातून काहीना काही निसटतच गेले.कृष्णाने त्याग केला.तो पण आनंदाने.ज्याला कृष्ण कळला,त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला.आयुष्यात काही सोडाव लागल तरीही कसे खुश राहायचे हे श्रीकृष्ण शिकवतात.कृष्णनितीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात.आयुष्यात बाकी नाही जमल तरी कृष्ण बनून हातातुन निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे.

हा सर्व दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर,शाळेतील शिक्षिका, श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम.सारिका राक्षे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम, सौ.सुमन दौंडकर, सौ.मिरा सराईकर यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

स्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे व स्व.विनायक मेटे यांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुका संयुक्त विद्यमाने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे व शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष-शिवस्मारक समितीचे अध्यक्ष- माजी आमदार स्व.विनायक मेटे यांचे निधन झाले असल्याने हवेली तालुका भारतीय जनता पार्टी व सर्व पक्षीय यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी धर्मेंद्र खांडरे, प्रविण काळभोर, रोहिदास उंद्रे, सुनिल सुभाष कांचन, विकास जगताप, श्रीकांत कांचन, अमित कांचन, भाऊ तुपे, भाऊसाहेब कांचन, सुनील कांचन, सुभाष बगाडे, अजिंक्य कांचन, पुनम चौधरी, सारिका लोणारी, आबासाहेब चव्हाण, ऋषिकेश शेळके, गणेश चौधरी , निखिल चोरडिया, राजेंद्र कांचन, संतोष कांचन, सागर कांचन, शरद खेडेकर, सचिन शेलार, निलेश कानकाटे, सुनील तांबे, केरबा बाबर, प्रशांत कोतवाल, प्रसन्न भोर, अक्षय रोडे, सुचिस्मिता वनारसे, पुजा सणस, रेखा तुपे, गणेश घाडगे, काजल खोमणे आदी उपस्थित होते.

उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

उरुळी कांचन

येथील श्रीकृष्ण सेवा मंडळ श्रीकृष्ण मंदिर उरुळी कांचन (ता.हवेली) याठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंदिरामध्ये फुलांची सजावट, रंगीबेरंगी पताका, लावण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व उत्साहात भक्तीभावाने भगवान श्रीकृष्णाचा जयघोष, आरती, पाळणा म्हणून जन्माष्टमी पार पडली. याप्रसंगी सदभक्त आबासाहेब पाटीलबुवा कांचन यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प.पु.प.सुबोधमुनी धाराशिवकर, दत्तात्रय कांचन, माऊली कांचन, शरद वनारसे, संजय कांचन, संतोष कांचन, संचिता कांचन, महादेव कांचन, उत्तम चौधरी, बापु कांचन, राजु कांचन, लाला कांचन, शांताराम चौधरी, बाबासाहेब चौधरी, सुनिल कांचन, संतोष चौधरी, संजय वनारसे, सुदर्शन कांचन, तुकाराम जगताप, अभिजित कांचन, आबासो मुरकुटे आदी सदभक्त व महिला तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकृष्ण महानुभाव मंदिर-श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठान कोरेगावमुळ (ता.हवेली), टिळेकरवाडी श्रीदत्त देवस्थान ट्रस्ट याठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

उरुळी कांचन

आगामी काळात दोन वर्षांच्या खंडानंतर गणेशोत्सव साजरा होणार आहे. कार्यकर्त्यांनी शासनाचे सर्व नियम व कायद्यांचे कसोशीने पालन करुन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन पुणे शहर पोलीसांच्या परिमंडल ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी केले. ३१ ऑगस्ट पासून सुरु होणा-या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विघ्नहर्ता न्यास पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांची एक बैठक मधुबन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नम्रता पाटील बोलत होत्या.

यावेळी सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, विघ्नहर्ता न्यासचे डाॅ मिलींद भोई, प्रताप निकम, सलिम शेख, महेंद्र आगरवाल, गणेश शिंदे, पोलीस ठाण्यातील सर्व आधिकारी व कर्मचारी, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, यशवंतचे माजी संचालक रघुनाथ चौधरी, गणेश मंडळांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नम्रता पाटील पुढे म्हणाल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर होणारा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. ग्रामीण व शहर असा कुठलाही भेद न करता पोलीस तुम्हाला सहकार्य, मदत करण्यासाठीच आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शासनाचे सर्व नियम व कायदे यांचे पालन करुन उत्सव साजरा करावा. मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारी परवानगी पोलीस ठाणे पातळीवरच मिळेल. वाहतुकीला अडथळा होईल असा मंडप घालू नये, अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, मंडपामध्ये श्रींच्या मुर्तीच्या व महिलांच्या सुरक्षेसाठी आपले कार्यकर्ते नियुक्त करावेत, प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूकीमध्ये वेळेचे बंधन कसोशीने पाळावे, गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. या नंतर ही काही अडचण आल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन यावेळी नम्रता पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले शहर पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या विघ्नहर्ता न्यासचे स्पर्धेत आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरी गणेश मंडळांने बक्षीस मिळवावे, त्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोत्कृष्ट मंडळांना लोणी काळभोर पोलीसांच्या वतीने तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

यावेळी विघ्नहर्ता न्यासचे डाॅ मिलिंद भोई यांनी विघ्नहर्ता न्यास बद्दल उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले पुणे शहरातील गणेशोत्सवाला विधायक स्वरुप देण्यासाठी गेल्या २५ – ३० वर्षांपासून सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना पारितोषक देण्याचे काम विघ्नहर्ता न्यासच्या वतीने करण्यात येते. सहभागी गणेश मंडळांच्या  गणेशोत्सवातील व वर्षभर होणा-या समाजोपयोगी कामांच्या आधारावर पारितोषिके प्रदान केली जातात. या साठी नियुक्त परीक्षक मंडळ सर्व गणेश मंडळांना भेट देतात.

माधुरी काळभोर, गौरी गायकवाड, स्मिता नाॅर्टन, हभप सचिन महाराज माथेफोड यांनी ही यावेळी  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाहीर महेश खुळपे यांनी देशभक्तीपर पोवाडे सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.

नवनियुक्त विघ्नहर्ता न्यास परीक्षक मंडळाचा सत्कार यावेळी नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खुळपे यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी मानले.