उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

उरुळी कांचन

येथील श्रीकृष्ण सेवा मंडळ श्रीकृष्ण मंदिर उरुळी कांचन (ता.हवेली) याठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंदिरामध्ये फुलांची सजावट, रंगीबेरंगी पताका, लावण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व उत्साहात भक्तीभावाने भगवान श्रीकृष्णाचा जयघोष, आरती, पाळणा म्हणून जन्माष्टमी पार पडली. याप्रसंगी सदभक्त आबासाहेब पाटीलबुवा कांचन यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प.पु.प.सुबोधमुनी धाराशिवकर, दत्तात्रय कांचन, माऊली कांचन, शरद वनारसे, संजय कांचन, संतोष कांचन, संचिता कांचन, महादेव कांचन, उत्तम चौधरी, बापु कांचन, राजु कांचन, लाला कांचन, शांताराम चौधरी, बाबासाहेब चौधरी, सुनिल कांचन, संतोष चौधरी, संजय वनारसे, सुदर्शन कांचन, तुकाराम जगताप, अभिजित कांचन, आबासो मुरकुटे आदी सदभक्त व महिला तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकृष्ण महानुभाव मंदिर-श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठान कोरेगावमुळ (ता.हवेली), टिळेकरवाडी श्रीदत्त देवस्थान ट्रस्ट याठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous articleगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न
Next articleस्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे व स्व.विनायक मेटे यांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुका संयुक्त विद्यमाने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित