Home Blog Page 85

सहकार महर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील पुरस्काराने प्रमोद दांगट यांचा गौरव

उरुळी कांचन

आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव आंबेगाव तालुक्यात मानाचा समजला जाणारा सहकार महर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील पुरस्काराने प्रमोद दांगट यांना गौरविण्यात आले. पत्रकारी क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारसाठी निवड केल्याबद्दल साई फाऊंडेशनचे अध्यक्ष अजयशेठ घुले व सर्व संचालक मंडळाचे प्रमोद दांगट यांनी विशेष ऋण व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी दहीहंडी सोहळा

नारायणगाव : (किरण वाजगे)

विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी,आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून गुरुवार (दि. १८ रोजी) ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिरामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गोकुळअष्ट्मी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला.

“आला रे आला गोविंदा” आला असा जयघोष करत शाळेचे विद्यार्थी मनोभावे दहीहंडीत सहभागी झाले होते.
अनेक बालगोपालांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष गोकुळाचे दर्शन घडले.

इयत्ता १ ली व ३री च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर सुंदर नृत्ये सादर केली . तसेच इ.४ थीच्या अवनिश नितीन बोऱ्हाडे याने कृष्ण जन्माची माहिती सांगितली व इ.३ री ची विद्यार्थिनी सान्वी महेश घोडेकर हिने जन्माष्टमीची गोष्ट सांगितली.

या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त श्रीमती नंदाताई डांगे मॅडम,डॉ. श्रीकांत विद्वांस सर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण अनिल तात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन अरविंद मेहेर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे, बालक मंदिर समितीच्या सदस्या मोनिकाताई मेहेर, रमेश जुन्नरकर, देविदास भुजबळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे मॅडम, उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे उपस्थित होते

इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मानवी थर रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताच सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद म्हणून पोह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन शेळके यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले. अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात शाळेतील दिंडी सोहळा पार पडला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाहन केलेल्या महरक्तदान शिबिरात ३४९६ रक्ताच्या पिशव्या संकलित

नारायणगाव : (किरण वाजगे)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात १४ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ४० ठिकाणी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात सर्व मिळून ३४९६ रक्त पिशव्या जमा झाल्या. सर्वाधिक १२६८ रक्तांच्या पिशव्यांचे भोसरी विधानसभा मतदारसंघात संकलित झाले.

खासदार डॉक्टर कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान करून या रक्तदान शिबिराच्या मोहिमेचा शुभारंभ केला. जुन्नर, आंबेगाव खेड, आळंदी, शिरूर आंबेगाव, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण ४० रक्तदान केंद्रामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून प्रतिसाद दिला.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच व त्यामध्ये तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवित हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये अशा स्वरूपात विमा देण्यात आला. रक्तदान करणाऱ्यांना आजीवन मोफत रक्त दिले जाणार असून त्यांच्या नातेवाईकांनाही वर्षभर मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.

खासदार डॉ कोल्हे यांनी दिवसभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराला भेट दिली. नारायणगाव येथील रक्तदान शिबिरात विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी ४२ व्या वेळी रक्तदान केले. त्याबद्दल युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते किरण वाजगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या रक्तदान शिबिरात भोसरी येथे १२७२, जुन्नर येथे ७७६, शिरूर येथे ४७८, आंबेगाव येथे ४७७, हडपसर येथे ३९७, खेड येथे ९७ जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

मृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना ( CSR फंडातून ) आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

कुरकुंभ , सुरेश बागल

महावितरण कंपनीत नियमित रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांकडून अगदी नियमित कामगारांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कामे केली जातात.

ही कामे करत असताना अनेक कंत्राटी कामगार कामावर असताना मृत्यूमुखी पडले. मात्र या कामगारांना महावितरण कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत झाली नाही.

 

महानिर्मिती कंपनीत कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडल्यास त्या कामगारांच्या वारसाला सांघिक सामाजिक जबाबदारी निधी ( CSR फंड ) मधून दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे.

महानिर्मिती कंपनीतील या तरतुदी नुसार महावितरण कंपनीत कर्तव्यावर असतांना मृत्युमुखी पडलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना देखील महावितरण कंपनीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी निधी ( CSR फंड ) मधून हे रुपये दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री. नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे महावितरण च्या व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांच्याकडे आज केली .

मृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना ( CSR फंडातून ) आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

कुरकुंभ , सुरेश बागल

महावितरण कंपनीत नियमित रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांकडून अगदी नियमित कामगारांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कामे केली जातात.

ही कामे करत असताना अनेक कंत्राटी कामगार कामावर असताना मृत्यूमुखी पडले. मात्र या कामगारांना महावितरण कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत झाली नाही.

महानिर्मिती कंपनीत कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडल्यास त्या कामगारांच्या वारसाला सांघिक सामाजिक जबाबदारी निधी ( CSR फंड ) मधून दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे.

महानिर्मिती कंपनीतील या तरतुदी नुसार महावितरण कंपनीत कर्तव्यावर असतांना मृत्युमुखी पडलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना देखील महावितरण कंपनीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी निधी ( CSR फंड ) मधून हे रुपये दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री. नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे महावितरण च्या व्यवस्थापकीय संचालक मा. विजय सिंघल यांच्याकडे आज केली .

नारायणगांवात आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा: माजी सैनिकांचा विशेष सन्मान

नारायणगाव (किरण वाजगे)

देशभर साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नारायणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तिरंगा जागृती रॅली, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, वृक्षारोपण, खाऊ वाटप, तसेच शहरातील माजी सैनिकांचा सन्मान आणि स्थानिक गायक कलावंतांचा संगीतमय देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम इत्यादींनी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनी राजा शिवछत्रपती प्रवेद्वार नारायणगाव पूर्ववेशीवर ग्रामस्थांसमवेत सामुदायिक ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार पूर्व वेशीजवळ भव्य मंचावर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम,भाषणे सादर करण्यात आली. सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे, उपसरपंच आरीफ आतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे , सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते मागील काही वर्ष देश सेवा केलेल्या माजी सैनिकांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.माजी सैनिकांच्या मागणीनुसार माजी सैनिक कार्यालयासाठी शिवाजी चौक तलाठी कार्यालय इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून माजी सैनिकांचा नामोल्लेख असणारा नामफलक ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात लावणार असल्याची घोषणा यावेळी सरपंच योगेश बाबू पाटे यांनी केली.

नारायणगाव येथील स्थानिक गायक कलावंतांनी संगीतमय देशभक्तीपर गीतांचा सुमधुर कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता झाली.माजी आमदार शरददादा सोनवणे,सरपंच योगेश बाबू पाटे,उपसरपंच आरीफ आतार, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गायक कलावंतांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

वाघोली येथील वि.शे.सातव हायस्कूलमध्ये ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा


गणेश सातव

वाघोली येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वि.शे सातव विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी वाघोली गावच्या माजी सरपंच तथा हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधराताई उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके,माजी सदस्य रामदास दाभाडे,माजी सरपंच जयश्रीताई सातव,माजी सरपंच, शिवदास उबाळे,माजी उपसरपंच, समीर भाडळे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले, मा. प्राचार्य नानासाहेब निंबाळकर, उपप्राचार्या तारा पवार,उपमुख्याध्यापिका संगीता गायकवाड,पर्यवेक्षक उद्धव गोडसे, बिभिषन पवार,उषा जठार सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयातील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला व मान्यवरांना मानवंदना देऊन, लेझीम पथकाने सुंदर प्रात्यक्षिके सादर केली.त्याचबरोबर मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात विद्यालयाचे प्राचार्य ओगले सर यांनी विद्यालयाला ज्या दानशूर व्यक्तींनी देणगी दिली त्यांचे आभार व्यक्त करून शाळेतील उपक्रमाविषयी माहिती दिली. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांचं स्मरण करून त्यांचे गुण आपल्या अंगी बाळगून एक चांगला नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. इयत्ता १०वी व १२वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. उत्कृष्ट प्रशासकीय कामाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले सरांना कै. शिवदास कावडे यांच्या स्मरणार्थ ओंकार कावडे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

चांगल्या कामाबद्दल विद्यालयातील उपशिक्षिका पुष्पा शिवले व संगीता शेंडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

इयत्ता दहावीच्या १९९४ बॅचच्या विद्यार्थ्यांनी ३० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना व दत्तात्रेय भाडळे यांनी १० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिले.गणवेशचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने विद्यालयाला ७५ बेंच देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा वाघ व शोभा माने यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता उपप्राचार्य तारा पवार यांनी आभार मानून केली.

भारतीय स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारती मजदूर संघाच्या पुणे जिल्हा कार्यालयावर ध्वजारोहण

कुरकुंभ , सुरेश बागल

भारतीय स्वातंत्रच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालयातील गच्चीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कोषाध्यक्ष श्री सागर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थिती श्री अभय वर्तक, उमेश विस्वाद, निलेश गाडगे, सचिन भायगुडे, सुनील शिंदे व सचिन मेंगाळे उपस्थित होते. या प्रसंगी सर्व कामगारांना एकत्रित करण्याचा निर्धार करण्यात आला.

तसेच फडके हौद चौक येथे असंघीटत क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम कार्ड काढण्याचे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कार्यक्रम प्रसंगी केले.

कुरकुंभ एमआयडीसी मध्ये भारतीय मजदूर संघाची अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोटार सायकल रँली

कुरकुंभ , सुरेश बागल

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने दि. १३ ऑगस्ट रोजी कुरकुंभ एम. आय. डी. सी. मध्ये व भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोटार सायकल रँली काढली होती.
रॅली मध्ये तिरंगा झेंडा, बॅनर, माध्यमातून कुरकुंभ औद्योगिक परिसरात कामगारांमध्ये राष्ट्रीय भावना वाढविण्यासाठी भारत माता की जय, जय हिंद, देश के हित में करेंगे काम काम का लेंगे पुरा दाम, देश भक्त मजदूरों ऐक हो ऐक हो.. घोषणा नी परिसर दणाणून गेला होता.

विविध कंपनी समोर झालेल्या मिटींग मधे स्वातंत्रच्या लढ्यात कामगारांचे योगदान, लोकमान्य टिळक यांच्या मंडाले तुरूंगा मधून सुटके करिता कामगार नी केलेला संप, बाबुगेनु यांचे बलिदान, ई प्रंसंग ची माहिती दिली. त्याच प्रमाणे कुरकुंभ एम आय डी सी मध्ये औषध उत्पादन कंपनी, खाद्य तेल कंपनी, विविध बहुऊपयोगी केमिकल कंपनी, असल्याने कोव्हीड लाॅकडाऊन कालावधीत शासन, समाज ची आवश्यकता म्हणून बहुतांश कंपनी ची उत्पादन प्रक्रीया चालू ठेवण्यासाठी कामगारांनी महत्वपूर्ण योगदान देवुन कोव्हीड महामारी मध्ये मात करण्यासाठी योगदान दिले या मधुन देशहित, समाज हिताचे महत्वपूर्ण योगदान राहीले आहे असे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले आहे.

केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांचे ४ कोड बिल मध्ये रूपांतर केले आहे. या मध्ये वेज कोड ची अंमलबजावणी त्वरित करण्या बाबतीत मागणी केली.

तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतना मध्ये वाढ, प्रलंबित किमान वेतन दरा मधील वाढ त्वरित करण्या बाबतीत, तसेच आय आर कोड व हेल्थ अॅड सेफ्टी कोड मधील कामगारांना जाचक अटी व नियम बदल्या बाबतीत भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे सुधारणा न केल्यास सरकार च्या विरोधात महाराष्ट्र व्यापी आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना दिला आहे.

या रॅली चे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी श्री.सचिन मेंगाळे, अर्जुन चव्हाण, सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ, निलेश गाडगे व कारगील इंडिया कुरकंभ कामगार कमिटी, ईटनन्स फाईन्स केमिकल कामगार कमिटी, सिल्पा लि कामगार कमिटी, हेंकल अॅडीसीव्ह कामगार कमिटी यांनी केले.
या वेळी कुरकुंभ, दौंड, भागातील विविध कंपनी मधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय सुनील वाव्हळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र शिबिराचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे)

गुंजाळवाडी तालुका जुन्नर येथील उपक्रमशील शिक्षक स्वर्गीय सुनील वाव्हळ सर यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे नुकतेच करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या हस्ते झाले . नारायणगाव येथे सेवाभावी कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर राहून विक्रांत पतसंस्थेने सहकार क्षेत्रासोबत सामाजिक कार्यातही लौकिक प्राप्त केला आहे. समाजातील वंचित व गरजू लोकांसाठी आरोग्य,शिक्षण क्षेत्रात संस्थेने भरीव कार्य केले आहे.मित्राच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेले विक्रांत संस्थेचे सेवाभावी कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मनोगत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केले.

विक्रांत पतसंस्थेचे माजी सचिव स्वर्गीय सुनील वाव्हळ यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विक्रांत पतसंस्था आणि डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुंजाळवाडी येथे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, गुंजाळवाडीच्या सरपंच रेश्मा वायकर, विघ्नहर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ.संदीप डोळे, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, पोलीस पाटील मंगलदास सोलाट, उपसरपंच रमेश ढवळे, आरीफ आतार, महेश शेळके, माया डोंगरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा.श्रीकांत फुलसुंदर, माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र नरसोडे, विक्रांत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे, सचिव निलेश गोरडे, तबाजी वागदरे, मेहबूब काझी, सतीश निमसे, सुनील ढवळे, संतोष शिंदे इत्यादी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय सुनील वाव्हळ यांनी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षकांसाठी, विशेषतः विनाअनुदानित शिक्षकांच्या न्याय हक्काच्या लढ्यात आमच्या सोबत सर्वत्र संघर्ष करण्याचे काम केले, त्यांच्या निधनानंतर शिक्षक संघटनेने एक लढवय्या कार्यकर्ता गमावला आहे. शिक्षक बांधव स्वर्गीय सुनील वाव्हळ यांचे कार्य कदापी विसरणार नाही असे मनोगत पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.

आदरांजलीपर आशाताई बुचके, संतोषनाना खैरे, योगेश पाटे, रेश्मा वायकर, मंगलदास सोलाट, डॉ.संदीप डोळे, इंतकाब शेख यांनी मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमांतर्गत जुन्नर तालुका रेस्क्यू टीम साठी वाव्हळ कुटुंबीयांकडून सुरक्षा किट देण्यात आले. यावेळी विक्रांत पतसंस्थेने स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवानिमित्त उपस्थित नागरिकांना तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण केले.

या शिबिरात एकूण १२५ नेत्र रुग्णांची तपासणी होऊन ४७ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मुख्य संयोजक संतोष वाजगे यांनी दिली.

शिबिर यशस्वी होण्यासाठी विक्रांत संस्थेचे सर्व पदाधिकारी,कर्मचारी, विक्रांत क्रीडा मंडळ, गुंजाळवाडी येथील विविध संस्था, स्वर्गीय सुनील वाव्हळ शिक्षक मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गोरडे यांनी केले. सूत्रसंचालन मुकेश वाजगे व अजित वाजगे यांनी केले. आभार अजय कानडे यांनी मानले.