भारतीय स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारती मजदूर संघाच्या पुणे जिल्हा कार्यालयावर ध्वजारोहण

कुरकुंभ , सुरेश बागल

भारतीय स्वातंत्रच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालयातील गच्चीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कोषाध्यक्ष श्री सागर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थिती श्री अभय वर्तक, उमेश विस्वाद, निलेश गाडगे, सचिन भायगुडे, सुनील शिंदे व सचिन मेंगाळे उपस्थित होते. या प्रसंगी सर्व कामगारांना एकत्रित करण्याचा निर्धार करण्यात आला.

तसेच फडके हौद चौक येथे असंघीटत क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम कार्ड काढण्याचे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कार्यक्रम प्रसंगी केले.

Previous articleकुरकुंभ एमआयडीसी मध्ये भारतीय मजदूर संघाची अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोटार सायकल रँली
Next articleवाघोली येथील वि.शे.सातव हायस्कूलमध्ये ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा