वाघोली येथील वि.शे.सातव हायस्कूलमध्ये ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा


गणेश सातव

वाघोली येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वि.शे सातव विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी वाघोली गावच्या माजी सरपंच तथा हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधराताई उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके,माजी सदस्य रामदास दाभाडे,माजी सरपंच जयश्रीताई सातव,माजी सरपंच, शिवदास उबाळे,माजी उपसरपंच, समीर भाडळे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले, मा. प्राचार्य नानासाहेब निंबाळकर, उपप्राचार्या तारा पवार,उपमुख्याध्यापिका संगीता गायकवाड,पर्यवेक्षक उद्धव गोडसे, बिभिषन पवार,उषा जठार सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयातील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला व मान्यवरांना मानवंदना देऊन, लेझीम पथकाने सुंदर प्रात्यक्षिके सादर केली.त्याचबरोबर मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात विद्यालयाचे प्राचार्य ओगले सर यांनी विद्यालयाला ज्या दानशूर व्यक्तींनी देणगी दिली त्यांचे आभार व्यक्त करून शाळेतील उपक्रमाविषयी माहिती दिली. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांचं स्मरण करून त्यांचे गुण आपल्या अंगी बाळगून एक चांगला नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. इयत्ता १०वी व १२वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. उत्कृष्ट प्रशासकीय कामाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले सरांना कै. शिवदास कावडे यांच्या स्मरणार्थ ओंकार कावडे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

चांगल्या कामाबद्दल विद्यालयातील उपशिक्षिका पुष्पा शिवले व संगीता शेंडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

इयत्ता दहावीच्या १९९४ बॅचच्या विद्यार्थ्यांनी ३० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना व दत्तात्रेय भाडळे यांनी १० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिले.गणवेशचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने विद्यालयाला ७५ बेंच देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा वाघ व शोभा माने यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता उपप्राचार्य तारा पवार यांनी आभार मानून केली.

Previous articleभारतीय स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारती मजदूर संघाच्या पुणे जिल्हा कार्यालयावर ध्वजारोहण
Next articleनारायणगांवात आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा: माजी सैनिकांचा विशेष सन्मान