नारायणगांवात आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा: माजी सैनिकांचा विशेष सन्मान

नारायणगाव (किरण वाजगे)

देशभर साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नारायणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तिरंगा जागृती रॅली, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, वृक्षारोपण, खाऊ वाटप, तसेच शहरातील माजी सैनिकांचा सन्मान आणि स्थानिक गायक कलावंतांचा संगीतमय देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम इत्यादींनी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनी राजा शिवछत्रपती प्रवेद्वार नारायणगाव पूर्ववेशीवर ग्रामस्थांसमवेत सामुदायिक ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार पूर्व वेशीजवळ भव्य मंचावर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम,भाषणे सादर करण्यात आली. सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे, उपसरपंच आरीफ आतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे , सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते मागील काही वर्ष देश सेवा केलेल्या माजी सैनिकांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.माजी सैनिकांच्या मागणीनुसार माजी सैनिक कार्यालयासाठी शिवाजी चौक तलाठी कार्यालय इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून माजी सैनिकांचा नामोल्लेख असणारा नामफलक ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात लावणार असल्याची घोषणा यावेळी सरपंच योगेश बाबू पाटे यांनी केली.

नारायणगाव येथील स्थानिक गायक कलावंतांनी संगीतमय देशभक्तीपर गीतांचा सुमधुर कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता झाली.माजी आमदार शरददादा सोनवणे,सरपंच योगेश बाबू पाटे,उपसरपंच आरीफ आतार, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गायक कलावंतांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Previous articleवाघोली येथील वि.शे.सातव हायस्कूलमध्ये ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा
Next articleमृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना ( CSR फंडातून ) आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी