मृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना ( CSR फंडातून ) आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

कुरकुंभ , सुरेश बागल

महावितरण कंपनीत नियमित रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांकडून अगदी नियमित कामगारांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कामे केली जातात.

ही कामे करत असताना अनेक कंत्राटी कामगार कामावर असताना मृत्यूमुखी पडले. मात्र या कामगारांना महावितरण कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत झाली नाही.

 

महानिर्मिती कंपनीत कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडल्यास त्या कामगारांच्या वारसाला सांघिक सामाजिक जबाबदारी निधी ( CSR फंड ) मधून दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे.

महानिर्मिती कंपनीतील या तरतुदी नुसार महावितरण कंपनीत कर्तव्यावर असतांना मृत्युमुखी पडलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना देखील महावितरण कंपनीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी निधी ( CSR फंड ) मधून हे रुपये दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री. नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे महावितरण च्या व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांच्याकडे आज केली .

Previous articleमृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना ( CSR फंडातून ) आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी
Next articleखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाहन केलेल्या महरक्तदान शिबिरात ३४९६ रक्ताच्या पिशव्या संकलित