विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी दहीहंडी सोहळा

नारायणगाव : (किरण वाजगे)

विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी,आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून गुरुवार (दि. १८ रोजी) ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिरामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गोकुळअष्ट्मी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला.

“आला रे आला गोविंदा” आला असा जयघोष करत शाळेचे विद्यार्थी मनोभावे दहीहंडीत सहभागी झाले होते.
अनेक बालगोपालांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष गोकुळाचे दर्शन घडले.

इयत्ता १ ली व ३री च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर सुंदर नृत्ये सादर केली . तसेच इ.४ थीच्या अवनिश नितीन बोऱ्हाडे याने कृष्ण जन्माची माहिती सांगितली व इ.३ री ची विद्यार्थिनी सान्वी महेश घोडेकर हिने जन्माष्टमीची गोष्ट सांगितली.

या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त श्रीमती नंदाताई डांगे मॅडम,डॉ. श्रीकांत विद्वांस सर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण अनिल तात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन अरविंद मेहेर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे, बालक मंदिर समितीच्या सदस्या मोनिकाताई मेहेर, रमेश जुन्नरकर, देविदास भुजबळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे मॅडम, उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे उपस्थित होते

इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मानवी थर रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताच सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद म्हणून पोह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन शेळके यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले. अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात शाळेतील दिंडी सोहळा पार पडला.

Previous articleखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाहन केलेल्या महरक्तदान शिबिरात ३४९६ रक्ताच्या पिशव्या संकलित
Next articleसहकार महर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील पुरस्काराने प्रमोद दांगट यांचा गौरव