सहकार महर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील पुरस्काराने प्रमोद दांगट यांचा गौरव

उरुळी कांचन

आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव आंबेगाव तालुक्यात मानाचा समजला जाणारा सहकार महर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील पुरस्काराने प्रमोद दांगट यांना गौरविण्यात आले. पत्रकारी क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारसाठी निवड केल्याबद्दल साई फाऊंडेशनचे अध्यक्ष अजयशेठ घुले व सर्व संचालक मंडळाचे प्रमोद दांगट यांनी विशेष ऋण व्यक्त केले.

Previous articleविद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी दहीहंडी सोहळा
Next articleगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न