कनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव

राजगुरूनगर- शालेय विद्यार्थ्यांन मध्ये भारतीय सणांविषयी, परंपरांविषयी, संस्कृती विषयी माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच विविध मूल्यांचा विकास व्हावा,आनंद प्राप्ती साठी,स्वच्छंदतेचा विकास व्हावा यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम.सारिका राक्षे मॅडम यांनी गोकुळाष्टमी/श्रीकृष्ण जन्मदिवस कधी साजरा केला जातो. या विषयी माहिती दिली. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या दिवशी कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. त्याला गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस म्हणून संबोधण्यात येते.

शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. अंजली शितोळे मॅडम यांनी श्रीकृष्ण जन्माची कथा सांगितली. श्री कृष्णाची विविध रूपे, गोकुळात मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा, राधेवर निस्वार्थ प्रेम करणारा मुरलीधर, सुदामा यांनी प्रेमाने आणलेले पोहे खाणारा, अर्जुनाला गीतेच्या रुपाने सर्वव्यापी ज्ञान देणारा युगंधर या विषयी माहिती दिली.
शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शुभांगी जाधव मॅडम यांनी श्रीकृष्णाच्या नाना क्रिडा प्रकारांविषयी माहीती दिली.

पशुमागे धावणे,गोपीकांकडे दही मागणे,न दिल्यास दगड मारून माठ फोडणे,वासरांना मोकळे सोडून मनोसोक्त दुग्धपण करून देणे, दही दूध बाजारात विकायला नेण्या अगोदर गवळयांच्या पोरांना मनोसोक्त खाऊ घालणे इत्यादी.
शाळेमध्ये छोटीशी दहीहंडी,दुध, दही,ताक, लाह्या,भाजलेली डाळ, साखर, लोणचे,फळांच्या फोडी या पासून तयार करण्यात आली.गोपाळ काल्याची दहीहंडी उंचावर बांधण्यात आली. आली.तेथे मानवी मनोरा करून गोविंदांचा हा साहसी खेळ खेळण्यात आला.यामध्ये विद्यार्थी गोविंदा आला रे,आला,आ गया माखन चोर,गोविंदा रे गोपाळा,गोकुळात आनंद झाला,चांदी की डाल पर सोने का मोर.अशा घोषणा देत होते.या कार्यक्रमात श्रीकृष्ण, राधा,गोपिका,पेंदया, सुदामा आणी बालगोपाळ अवतरले होते.
दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना काल्याचा प्रसाद देण्यात आला.

या दहीहंडी सारख्या साहसी खेळांमधून आपल्याला एकीचे बळ,सहनशीलता,संघर्ष, विश्वास, अनुभव, एकाग्रता, जिद्द, लक्ष्य या गोष्टींचे जीवन जगत असतानाचे महत्वपूर्ण ज्ञान मिळते असे शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर यांनी सांगितले.

या नंतर शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम.सारिका राक्षे मॅडम यांनी सांगितले की कृष्णाला जीवनात बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत.त्यांचे आई वडिल लगेच वेगळे झाले,नंद, यशोदा भेटले,पण आयुष्यातून तेही गेले,राधा गेली,गोकुळ गेल,मथुरा गेली, आयुष्यातून काहीना काही निसटतच गेले.कृष्णाने त्याग केला.तो पण आनंदाने.ज्याला कृष्ण कळला,त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला.आयुष्यात काही सोडाव लागल तरीही कसे खुश राहायचे हे श्रीकृष्ण शिकवतात.कृष्णनितीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात.आयुष्यात बाकी नाही जमल तरी कृष्ण बनून हातातुन निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे.

हा सर्व दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर,शाळेतील शिक्षिका, श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम.सारिका राक्षे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम, सौ.सुमन दौंडकर, सौ.मिरा सराईकर यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

Previous articleस्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे व स्व.विनायक मेटे यांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुका संयुक्त विद्यमाने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित
Next articleअजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन कडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा