वाफगाव येथे ४५ वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी

राजगुरूनगर- रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय, वाफगाव येथील विद्यालयात ४५ वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. या विद्यालयातील सन १९७७/७८ इयत्ता दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनी व शिक्षकांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यासाठी या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक तानाजी चन्ने सर व आनंदराव यादव सर आमंत्रित केले होते.याप्रसंगी ३५ ते ४० विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिक्षक तानाजी चेन्ने सर तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव यादव सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रगीत व रयत गीताने सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी सर्व गुरुवर्यांचे सन्मानचिन्ह, शाल, फेटा, पुष्पगुच्छ, श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला व माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या वस्तीगृहास व शाळेला देणगी देण्यात आली.

या प्रसंगी अगदी ४५ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी भेटले व त्यांनी आपल्या प्रति सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. याबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले व विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून मी काम केले. त्यामुळेच असे विद्यार्थी घडले म्हणून आनंद झाला असे अध्यक्ष चेन्ने सरांनी भावनिक उदगार काढले. तर प्रमुख पाहुणे यादव सर आपल्या मनोगतात म्हणाले अण्णांनी ज्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली तो हेतू पूर्ण झाला असे ते म्हणाले व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. भिमराज मंडले, नारायण डोके, सुरेश मांदळे, शंकर पिंगळे, बाळासाहेब तांबे, नारायण वाघोले, शंकर रहाटूळ, सुजाता कोरपे, शंकर तांबे, सखाराम ढेरंगे, प्रा. शहाजी वाळुंज, राजेंद्र थिटे, आनंदराव तांबे, जयराम कोरडे, रामचंद्र पानसरे, भगवान चौधरी, चिंतामन गोडसे, रामदास गुरव, सावळेराम येवले, रजनी अर्वीकर, सूर्यकांत होळकर, लीला रामाणे आदी विद्यार्थ्यांनी आपला प्रवास कथन केला व आज आम्ही केवळ या हायस्कूलमुळे व रयत शिक्षण संस्थेमुळेच उभे राहिलो, घडलो ही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, वस्तीगृहाचे अधिक्षक सांडभोर सर, नाना कराळे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

प्रमुख वक्ते धर्मराज पवळे यांनी रयत शिक्षण संस्था, कर्मवीर आण्णा व वाफगाव शाळेबद्दल सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण डोके यांनी केले तर आभार नारायण वाघोले यांनी मानले.

Previous articleदत्तपीठ दत्त मंदिर तर्फे व्याख्यानाचे आयोजन
Next articleभोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा शिरपेचात मानाचा तुरा