साहित्यिक मधुकर गिलबिले यांची ” साहित्य गौरव पुरस्कार २०२३ ” करीता निवड

राजगुरुनगर – येथील साहित्यिक, मधुकर गिलबिले गुरुजी यांची ” साहित्य गौरव पुरस्कार २०२३” करीता निवड झाल्याचे निवडपत्र संमेलन कार्य अध्यक्ष रानकवी जगदिप वनशिव यांनी मधूकर गिलबिले यांना दिले आहे.
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणीं रविवार दिनांक २० आगस्ट २०२३ रोजी सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले आहे. यावेळी साहित्य, नाट्य चित्रपट कला,पत्रकारिता,सामाजिक शैक्षणिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटक आमदार दत्ता मामा भरणे( माजी पालकमंत्री सोलापूर),प्रमुख पाहुणे मेघराज राजे भोसले,(अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ),ज्येष्ठ कविवर्य, वसंतराव पाटील  (जलदगती हायकोर्ट माझगाव न्यायाधिश),श्रीमंत आकळे साहेब (सहाय्यक पोलीस आयुक्त परिवहन विभाग,पुणे), सिने अभिनेता बाबा गायकवाड ,प्रा.डा.संदीप सांगळे (सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष) संमेलनाचे अध्यक्ष लोककवी सिताराम नरके( माजी पोलीस अधिकारी राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी),बाळासाहेब गिरी (गझलकार),अशोक जाधव(माजी जिल्हा आधिकारी),लक्ष्मण शिंदे (वनविभाग मुख्यालय लेखापाल पुणे) ,जयश्री सोनवणे(उद्घाटन सोहळा,वृत्तनिवेदिका),संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड व संमेलनाचे कार्याध्यक्ष रानकवी,जगदीप वनशिव(निवेदक)आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मधुकर गिलबिले यांचे साहित्य क्षेत्रात चार पुस्तकांचे लेखन,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण मार्फत साहित्य क्षेत्रात कार्य ,तसेच राज्यातील विविध साहित्य संमेलन, कवी संमेलन यात सक्रिय सहभाग या बद्दल मधुकर गिलबिले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.सर्व स्तरातून याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleसाहित्य क्षेत्रातून शरद गोरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे- श्रीपाल सबनीस
Next article रोहिदास उंद्रे व प्रविण दरेकर यांची डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड