रोहिदास उंद्रे व प्रविण दरेकर यांची डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड

उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास दामोदर उंद्रे पाटील तसेच प्रविण दरेकर यांची तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी दिली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, कांतीलाल चौधरी, संजय टिळेकर, खेमचंद पुरुसवाणी, अनिकेत कांचन, संजय कांचन, जीवन शिंदे, सारिका काळभोर, कमल कांचन, धनसिंग पोंदकुले, संस्थेचे व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, सह व्यवस्थापक ऋषीकेश भोसले, सुनिल तांबे, संगिता काळे, सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उंद्रे व दरेकर यांच्या निवडीने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या शैक्षणिक सामाजिक स्तुत्य उपक्रमात मध्ये सहभागी आहोत सभासदाच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे नुतन तज्ञ संचालक रोहिदास उंद्रे यांनी सांगितले.

Previous articleसाहित्यिक मधुकर गिलबिले यांची ” साहित्य गौरव पुरस्कार २०२३ ” करीता निवड
Next articleराजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप