राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

उरुळी कांचन

आपली आजची येणारी पिढी ही खर्‍या अर्थाने भारताच भविष्य आहे. आणि आज अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्थकारणामुळे अनेकांना आपल शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे. त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत असल्याने डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे वसुली आधिकारी ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीप्रयागधाम येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले याप्रसंगी सुनील तांबे बोलत होते.

यावेळी सरपंच महात्माजी ब्रीजमोहन धवन, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दाभाडे, शिक्षिका मनिषा टिळेकर, अनिता कदम, शुभदा मुळे, प्रिया जमदाडे, डॉक्टर देविदास चांदणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल भोसले, लक्ष्मण हेंद्रे, विजय कुंजीर, शांताराम महाडिक आदी उपस्थित होते.

Previous article रोहिदास उंद्रे व प्रविण दरेकर यांची डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड
Next articleसंकष्टी चतुर्थी निमित्ताने चिंतामणीला भाविकांची गर्दी चिंचवड देवस्थानच्या वतीने विशेष लक्ष