संकष्टी चतुर्थी निमित्ताने चिंतामणीला भाविकांची गर्दी चिंचवड देवस्थानच्या वतीने विशेष लक्ष

उरुळी कांचन

पुरुषोत्तम मास (आधिकमास) संकष्टी चतुर्थी पावसाची उघडल्याने भाविकांची पहाटे पासून श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे मंगलमूर्तीस आगलावे यांनी श्रींची पूजा केली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्रीं चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प.आनंद महाराज तांबे उपस्थित होते. चिंचवड देवस्थान व आगलावे बंधूच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली व मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आला. देवस्थानच्या वतीने मंदिराच्या बाहेर दर्शन बारी व वरील बाजुस छत बांधण्यात आला होता. दुपारी देवस्थानच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी व चिवडा वाटण्यात आला. सायंकाळी भाविकांची वाढत गेली.

आळंदी देवाची येथील ह.भ.प.विष्णु महाराज मिरदे यांचे कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रीचा छबिना निघाला नंतर उपस्थितीत भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता. ग्रामस्थाच्या वतीने पार्किंग व्यवस्था केली होती.

Previous articleराजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
Next articleश्री दत्त पीठ दत्तमंदिर येथे अन्नपूर्णा प्रसादालयाचे उदघाटन