भारतीय सेना दलाच्या वतीने ७५ गडकिल्ल्यांवर फडकावला तिरंगा

पुणे – भारतीय सेनादलाच्या सदर्न कमांडतर्फे आखल्या गेलेल्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमात यंदाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी, सदर्न कमांडच्या आखत्यारीत येणाऱ्या राज्यांपैकी सुमारे ६ राज्यांमधील ७५ गडकोटांवर एकाच वेळी तिरंगा फडकावला गेला. त्यापैकी तब्बल ४९ गडकिल्ले हे महाराष्ट्रातील होते.

साहस आणि देशप्रेमाने भारलेल्या अशा एका अतिशय अनोख्या उपक्रमात, भारतीय सेनादलातील अधिकारी व जवानांबरोबर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडांवर जाऊन तिरंगा फडकवण्याचा व स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अनुभव महाराष्ट्रातील ३०० हून अधिक साहसप्रेमींनी घेतला. या उपक्रमाचा समन्वय करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या ‘गिरिप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेने सदर्न कमांडला सहकार्य केले आणि उपक्रमाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील सर्व भागातून गिर्यारोहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

या उपक्रमात इंडियन आर्मीचे जवान डोके शामराव बळीराम, व्ही आर बिराजदार, माळी गोरख शंकर, नवीन कुमार, गायकवाड सागर उत्तम, कांदेकर विष्णू शंकर,अनुसया सचिन गणपत, चव्हाण विशाल चंद्रकांत, जोगदंड संजय श्रीराम, महामुलकर विशाल,तबियार भारत कुमार बी उपस्थित होते. त्यांच्या समवेत उमेश झिरपे मामा यांच्या मार्गदर्शनखाली साहसी गिर्यारोहक अक्षय भोगाडे, सचिन पुरी, प्रवीण झोपे, विनोद कुलकर्णी, प्रभाकर भालचीम, समीर, माऊली हेही सहभागी झाले होते.

Previous articleनारायणगाव बाह्यवळण मार्गावरील खोडदरोड चौकात शिवशाही बसला अपघात
Next articleकुराण शरीफ फाडल्याच्या निषेधार्थ नारायणगावात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध