माजी विद्यार्थ्यांची २० वर्षांनी पुन्हा भरली शाळा

योगेश राऊत पाटस

पाटस येथील नागेश्वर विद्यालयात शाळेच्या इयत्ता दहावीच्या सन २००३ च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनाचा स्नेह मेळावा रविवार (ता.०७) रोजी शाळेच्या भव्य मैदानात अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला.

तब्बल वीस वर्षांनी त्यावेळच्या विद्यार्थी व विध्यार्थीनीं व शिक्षक वर्ग भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या शाळेत शिक्षण घेऊन सर्वच विद्यार्थी वेगवेगळ्या व्यवसायात, वैद्यकीय सेवा, बँकिंग क्षेत्रात, शिक्षण, आय टी इंजिनिअरिंग अश्या अनेक नोकरी व व्यावसायिक क्षेत्रात करिअर करत आहेत. हे सर्व जण आपला वेळात वेळ काढून तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याने वेगळाच आनंद पाहायला मिळाला. वीस वर्षांपूर्वीचे शिक्षक यामध्ये जठार सर, सावंत सर, नांगरे सर, माजी प्राचार्य आखाडे सर, फरांदे सर, पाटील सर, रायबान सर, शिंदे सर, लोहार सर, जाधव सर, कुंभार सर, शिशुपाल सर, फाळके सर, कोळी सर, बंदीष्टी सर, शेंडे सर, जंगम सर तसेच शाळा प्रतिनिधी म्हणुन संकपाळ सर व उत्तम रुपनवर हे शिक्षक वर्ग उपस्थित होता. विद्यार्थी व विद्यार्थीनीं तसेच शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सन २००३ च्या दहावीच्या बॅचने शाळेतील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य, स्पोर्ट्स चे साहित्य, ग्रंथालयासाठी विविध प्रकारचे पुस्तक संच भेट देण्यात आली. तसेच माजी विद्यार्थी अमोल वरघडे यांनी शाळेतील गरीब वीस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाचे आयोजित केल्याने शाळेला व विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू भेट दिल्या जात असल्याने विद्यालयाला संजीवनी मिळत आहे.

सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक म्हणून या विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ ज्योती जगताप, डॉ शितल रसाळ, कविता दिवेकर, गीता दराडे, दिनेश वलघुडे, सुमित बंदीष्टी, गणेश चव्हाण, सागर गायकवाड, महेश लोंढे, प्रसाद वळे, सागर बनकर, सतीश पवार, शिवराज तोंडे यांनी परिश्रम घेतले

Previous articleमहावितरण मधील कंत्राटी कामगारांचे लाक्षणिक उपोषण
Next articleशिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग होऊ देणार नाही, भूमिका म्हणजे पोलीसांच्या गौरवशाली परंपरेला गालबोट