दत्तपीठ दत्त मंदिर तर्फे व्याख्यानाचे आयोजन

दिनेश पवार:दौंड

दत्तपीठ दत्त मंदिर व अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या वतीने जेष्ठ पौर्णिमा निमित्त श्री दत्तगुरूंची आरती व शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त दौंड सिद्धटेक,बुवा सावंत शेतकी फार्म येथे सह्याद्री व राजा शिवराय या विषयावर शशिन कुंभोजकर यांचे व्याख्यान रविवार दि.४जून २०२३ रोजी सांयकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना,पुष्पांजली केली जाणार आहे, श्री गुरुदत्त यांची आरती व महाप्रसाद होणार आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दत्तपीठ मंदिर च्या वतीने विलास बर्वे,बुवा सावंत व अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे

Previous articleराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचा ज्येष्ठ नागरिक संघाने केला सन्मान
Next articleवाफगाव येथे ४५ वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी