राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचा ज्येष्ठ नागरिक संघाने केला सन्मान

नारायणगाव : (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील ठिकेकर ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नारायणगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.
भारत सरकार तर्फे अपारंपारिक उर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडीच्या ग्रामपंचायतीला “ग्रामऊर्जा स्वराज्य पंचायत” हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते रुपये एक कोटी देऊन नुकताच नवी दिल्ली येथे सत्कार करण्यात आला होता.
यामुळेच या विशेष सत्काराबद्दल नारायणगाव येथील स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, (नारायणगाव/ वारुळवाडी) यांच्या वतीने ठिकेकरवाडी गावचे सरपंच संतोष ठिकेकर यांचा संघाच्या कार्यालयात विशेष सन्मान करण्यात आला.

संघाच्या वतीने दर महिन्याच्या १५ तारखेस त्या महिन्यात ज्या ज्येष्ठ नागरिकांचा जन्म असेल त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. हे निमित्त साधून जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष ठिकेकर, ग्रामसेवक अस्लम शेख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष गडगे यांना सत्कारार्थी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमास सरपंच संतोष ठिकेकर, ग्रामसेवक अस्लम शेख, माजी सरपंच प्रमोद नाना ठिकेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर तुकाराम ठिकेकर तसेच संघाचे सभासद उपस्थित होते.

संघाची स्थापना सन २००४ मध्ये रमेश पाटे यांनी केली व आजतागायत ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. चा पास मिळवून देणे, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे ५० वर्षे वैवाहिक जीवन यशस्वी केले त्यांचा सत्कार, ज्येष्ठांना छत्री वाटप, काठी वाटप, अंगणवाडीच्या ८०० मुलांना वॉटर बॅग वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पंढरपुर येथील धर्मशाळेस आर्थिक मदत तसेच अन्नदान, शालेय मुलांना खाऊचे वाटप, सभासदांसाठी आरोग्य शिबीर, आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करणा-या आशा वर्कर व सेवक यांचा सत्कार, पोलीस कर्मचारी तसेच विना अपघात एस. टी. ड्रायव्हर यांचा सत्कार, महिलादिनी ग्रामपंचायत नारायणगाव/वारुळवाडी येथील महिला सफाई कर्मचारी व सेवक यांचा सत्कार, ९० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा घरी जाऊन सत्कार करणे, राष्ट्रीय सणांचे दिवशी रुग्णालयात जाऊन रुग्णालयात फळांचे वाटप करणे, १०वी/१२ वी प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात.या कार्यक्रमातही वाढदिवस असणा-या ज्येष्ठ नागरिकांचा पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्रामसेवक अस्लम शेख व सरपंच संतोष ठिकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच ठिकेकर यांनी आपल्या मनोगतात वादाचे कारण ठरणारी शेतीची मोजणी, ओल्या कच-यापासून गोबरगॅस निर्मिती, सौरऊर्जेतून पथदिवे, गरम पाण्याचा पुरवठा करणारी सौरबंब – सयंत्र निर्मिती, पवन ऊर्जेमार्फत विद्युत निर्मिती, शाळेला शून्य रुपये विजबील यावे म्हणून ५ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प, प्रत्येक बाबीत ग्रामस्थांचा सहभाग यामुळेच देशात आपल्या पुणे जिल्ह्यातील ठिकेकरवाडीचा डंका वाजला.

या कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष रमेश पाटे, उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, कार्याध्यक्ष अरुण क्षीरसागर भाऊसाहेब, सचिव सदाशिव भोसले, सहसचिव परशुराम कोते, सदस्य खंडू भुजबळ, दशरथ खेबडे, बापूसाहेब डोके, अरविंद मेहेर, सुर्यकांतशेठ गांधी, अशोक औटी, फुलसुंदर महाराज, वसंत मेहेत्रे, बबनराव पानसरे, रत्नाकर सुबंध सर, मारुती डेरे, बाळासाहेब पाटे, निवृत्ती गायकवाड, अरुण औटी, विजय शिंदे, प्रभाकर डेरे, शंकर नाना कोल्हे, दिनकर शिंदे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संघाचे सहसचिव परशुराम कोते यांनी प्रास्ताविक केले.
आभार बापूसाहेब डोके यांनी मानले.

Previous articleशिवस्फूर्ती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नित्यानंद नेवकर,उपाध्यक्षपदी रवींद्र कोडीलकर यांची बिनविरोध निवड
Next articleदत्तपीठ दत्त मंदिर तर्फे व्याख्यानाचे आयोजन