भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा शिरपेचात मानाचा तुरा


चाकण- भोसे ( ता. खेड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक ( इ. १० वी ) व उच्च माध्यमिक ( इ. १२ वी ) प्रमाणपत्र परीक्षा २०२३ मध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे ५ संचलित परमपूज्य बापूसाहेब मिटकर मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे,ता.खेड,जि.पुणे शाळा व महाविद्यालयाचा निकाल १००% लागला. शाळा व महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा सलग चार वर्षे राखली. तसेच शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धांमधून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयातील देवांग अंकुश गांडेकर याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे .अभ्यासाच्या मैदानात बाजी मारताना या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी खेळाच्या मैदानातही बाजी मारून प्रशालेचे नाव राष्ट्रीयपातळीपर्यंत पोहचवले आहे.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश गवळी यांनी दिली .

महाविद्यालयातील (इ १२ वी ) प्राविण्य प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक : कुटे अथर्व ज्ञानेश्वर (७९.१७%) द्वितीय क्रमांक : कुटे पायल रामदास (७८.५० %) तृतीय क्रमांक :पाटील अविनाश कृष्णदेव (७६.५० %) चतुर्थ क्रमांक : पिंगळे विराज जालिंदर (७४.१७ %) पाचवा क्रमांक :गांडेकर कादंबरी विकास (७०.०० %)

विद्यालयातील (इ १०वी ) प्राविण्य प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक : नगरे तेजस्विनी सुधाकर (९४.००%) द्वितीय क्रमांक : पाटील हेमांगी विजय . (९१.४० %) तृतीय क्रमांक : गांडेकर श्रावणी संदिप (८९.४० %) चतुर्थ क्रमांक : पवार प्रियांका सुभाष (८९.०० %) पाचवा क्रमांक : कुटे कृष्णा रविंद्र (८८. ४०%)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे ५ चे कार्याध्यक्ष डॉ ग र एकबोटे सर , कार्यवाह शामकांत देशमुख सर , शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश तोडकर सर, मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश गवळी सर व समस्त ग्रामस्थ भोसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Previous articleवाफगाव येथे ४५ वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी
Next articleविधवा अनिष्ट प्रथा बंदचा खोडदच्या ग्रामसभेत एकमुखाने ठराव