नारायणगावात कॅफे अल्पवयीन मुला-मुली़चे अश्लील चाळे;कॅफे चालकांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

कॅफे हाऊस मध्ये मुला- मुलींचे असभ्यवर्तन व अश्लील चाळे चालू असताना नारायणगाव पोलिसांनी दोन कॅफे मालकांवर कारवाई केली आहे. सुवर्णा श्रीकांत गडगे व अपेक्षा बाजीराव टाव्हरे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारूळवाडीतील कॉलेज रोड वरील मूनलाईट कॅफे हाऊसचे मालक विशाल संदीप पवार (वय २० वर्ष) राहणार पाटे खैरे मळा, नारायणगाव) व कॅफे क्रीमचे मालक समर्थ कालिदास सरोदे (वय २१, राहणार खोडदरोड, नारायणगाव) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जुन्नर शहरात दोन दिवसांपूर्वी एका कँफेवर केलेल्या कारवाई नंतर नारायणगावात पोलिसांनी ही कारवाई। केली आहे.
मूनलाईट कॅफे हाऊस मध्ये मुला मुलींना एकांतात बसण्यासाठी पडद्यांचे पार्टिशन करून बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. त्या ठिकाणी असभ्य वर्तन व अश्लील चाळे चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. नारायणगाव मध्ये काही कॅफे हाऊस मध्ये मुला मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु त्याकडे पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. पालकांनी आपल्या मुलींची काळजी घेणे गरजेचे आहे.

कॅफे हाऊस मध्ये अनेक मुलं-मुली दोन दोन तास बसलेले आढळून येतात. खरंतर पालकांनी आपल्या मुले व मुली शिक्षणासाठी कॉलेजला उपस्थित असतात का? याची माहिती नसते. परंतु पालकांनी आपल्या मुलांवर व मुलींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी कॉलेजमध्ये जाऊन उपस्थिती बघणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील प्राचार्यांनीही याबाबतीत लक्ष ठेवून सातत्याने गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करणे आवश्यक आहे. कॉलेजमधील अनेक मुलं-मुली कॅफे हाऊस मध्ये गेल्यानंतर आपल्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलून अनेक वेळ बसून असतात. त्यासाठी कॅफे मालकांनी पडदे लावून व्यवस्था केलेली आढळून येते. पोलिसांनी कॅफे हाऊस वर छापे घातले तर कॅफे हाऊस मध्ये चालणाऱ्या असभ्य वर्तन व अश्लील चाळ्यांना जरब बसेल. याबाबत ठोस कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.

Previous articleअजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन कडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
Next articleभारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे पुणे येथे स्वागत