महात्मा गांधी विद्यालयाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षानी घेतला मेळावा : शिक्षकांनी केले मार्गदर्शन

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला मेळावा दोन वर्षांनंतर शिक्षक व विद्यार्थी सोबत आले होते.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी आपली उपस्थिती दाखवली.

त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी
शिक्षकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयश अंकुश बारस्कर व ज्ञानेश्वरी अनिल निगडे यांनी केले.

कलागुण , शैक्षणिक गोष्टींवर सर्व विद्यार्थ्यांनी चर्चा केली. व चालू शैक्षणिक घडामोडीवर शिक्षकांची चर्चा व सल्ला घेतला.
सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना उमेश कसबे सर यांनी भविष्यातील वाटचालीस योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कु.जय विकास टिळेकर व कु.आदित्य सुरेश वाळेकर यांनी केले होते. कार्यक्रमाला आलेल्या सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कु. रोहन देविदास ताम्हणे यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleभारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे पुणे येथे स्वागत
Next articleचौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र भुलेश्वर येथे मराठा महासंघाच्या वतीने बेलांच्या झाडांचे वृक्षारोपण