किसान सभाचे पुणे जिल्ह्याचे अधिवेशन बुधवारी होणार घोडेगावला:शेतकरी नेते, डॉ.अजित नवले राहणार उपस्थित

घोडेगाव

संपूर्ण देशभर असलेल्या,अखिल भारतीय किसान सभा या राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी, शेतमजुर हिताचे काम आहे.सद्यस्थितीत राज्यभर जिल्हानिहाय किसान सभेची अधिवेशन सुरू आहेत.

पुणे जिल्हा किसान सभा समितीचे, नववे जिल्हा अधिगवेशन,येत्या बुधवारी घोडेगाव ता.आंबेगाव येथे पार पडत आहे.

या अधिवेशनात मागील तीन वर्षात, संघटनेने केलेल्या शेतकरी व श्रमिक वर्गासाठीच्या कामाचा अहवाल मांडून त्यावर चर्चा होईल तसेच पुढील काळात कोणत्या प्रश्नावर काम करायचे याबाबत दिशा निश्चित केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहे.या अधिवेशनाचे उद्घाटक अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष कॉ.किसन गुजर हे करणार आहे.तर प्रमुख उपस्थिती म्हणून,

कॉ.अजित अभ्यंकर (जेष्ठ कामगार नेते)कॉ.उमेश देशमुख (खजिनदार,अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य)को.गणेश दराडे (माकपा,पुणे जिल्हा सचिव)हे असणार आहेत.

या अधिवेशनाचा समारोप शेतकरी नेते व अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य समितीचे सरचिटणीस डॉ.अजित नवले हे करणार आहेत.

सदरील अधिवेशनाचे संयोजन पुणे जिल्हा समितिचे अध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे,सचिव डॉ.अमोल वाघमारे, व जिल्हा समिती सदस्य अशोक पेकारी,राजू घोडे,विश्वनाथ निगळे, लक्ष्मण जोशी,महेंद्र थोरात,अमोद गरुड,संतोष कांबळे,इ.करत आहे.

Previous articleउरुळी कांचन-डॅा.मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना स्टिकचे वाटप
Next articleराज्यस्तरीय फायर आर्म कॉम्पिटीशन स्पर्धेत मावळातील ग्रामीण भागातील स्पर्धकांचे विशेष गुण संपन्न