उरुळी कांचनमध्ये ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

उरुळी कांचन

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आपण रक्तदान करुन एखाद्या गरजवंतांची गरज पुर्ण करु शकाल. हे महादान करुन पुण्य पदरात पाडुन घेऊ या. ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने सातत्याने समाजोपयोगी विधायक स्तुत्य उपक्रम राबविले जात असल्याचे असे मत जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन यांनी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक तुळशीचे रोप, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन प्रत्येक रक्तदात्यांना योग्य प्रकारे सन्मानित करण्यात आले.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, पु.जि.नि.स.सदस्य संतोष कांचन, मा.सरपंच संतोष कांचन, ग्रा.प. सदस्य अमित कांचन, सुनिल तांबे, प्राचार्य भारत भोसले, युवा नेते सुभाष बगाडे, पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, दै.सकाळ पत्रकार सुवर्णा कांचन, दै.लोकमत पत्रकार सचिन माथेफोड, भाजपचे शहर अध्यक्ष अमित कांचन, मा.उपसरपंच युवराज कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अंलकार कांचन आदी उपस्थित होते.

ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचे आयोजक संतोष चौधरी, अजिंक्य कांचन, शांताराम चौधरी, किरण वांजे, महादेव काकडे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे, आशुतोष तुपे, धनाजी ढावरे, आदी गुप्र सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहालक्ष्मी एव्हीएशनच्यावतीने मोफत हवाई सफर
Next articleउरुळी कांचन-डॅा.मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना स्टिकचे वाटप