खासदार डाॕ.अमोल कोल्हे यांनी पुणे- सोलापूर महामार्गाची केली पाहणी

उरुळी कांचन

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून पुणे सोलापूर महामार्गाची पाहणी करुन तातडीने कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. पुणे सोलापूर रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात व त्यामुळे होणारे नाहक मृत्यू याबाबत स्थानिक नागरिक व सोशल मीडिया वरून दररोज मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन व महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्यावर वस्तुनिष्ठ टीका केली जात होती.

चार दिवसापूर्वीच लोणी काळभोर येथील रेल्वे स्टेशन चौकामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू तसेच एका अल्पवयीन मुलाचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व टीका केली जात होती या गंभीर बाबीची दखल खासदार अमोल कोल्हे यांनी घेऊन आज हडपसर रवी दर्शन पासून ते लोणी टोलनाका कदमवाक वस्ती, लोणी रेल्वे स्टेशन, लोणी काळभोर फाटा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी ते उरुळी कांचन पर्यंत रस्त्याची पाहणी करुन निवेदन स्वीकारले अमोल कोल्हे यांनी संबंधित महामार्गाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. पुणे सोलापूर रोड व उरुळी कांचन येथील शिंदवणे चौकातील झालेली अतिक्रमणे स्वताःहुन काढावीत तसेच अतिक्रमणे काढण्याबाबत कोणीही राजकीय हस्तक्षेप करू नये असेही कोल्हे यांनी सांगितले. याबाबत पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश खासदार अमोल कोल्हे यांनी दिले असून कार्यवाही न झाल्यास स्वतः आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. यावेळी पाहणी दौऱ्यात संबंधित अधिकारी वर्ग तसेच आजी-माजी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, नागरिक, महिला, विद्यार्थी ,पत्रकार उपस्थित होते.

Previous articleकेंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांना भारतीय मजदूर संघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन
Next articleखासदार डाॕ. अमोल कोल्हे यांनी पुणे- सोलापूर महामार्गाची केली पाहणी