रोटरी क्लब नारायणगाव हायवेचा आदिवासी भागात अभ्यास दौरा

नारायणगाव : – (किरण वाजगे)

छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेली शिवजन्मभूमी जुन्नर येथे पर्यटनाला मोठा वाव आहे. राज्यातील एकमेव पर्यटनाचा दर्जा लाभलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका होय.
दिवसेंदिवस येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे. पर्यटन केल्याने ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक व अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच मानसिक थकवा जाऊन निश्चित सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

याच अनुषंगाने रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे टोक असलेले आंबे हातवीज येथील कांचन धबधबा, कोकणकडा, दुर्गादेवी, तसेच घंटेचा दगड या पर्यटन स्थळाबरोबरच आंबोली येथील दाऱ्याघाट येथे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांचा अभ्यास दौरा २८ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जुन्नरच्या आदिवासी भागातील असलेले ऐतिहासिक महत्त्व तेथे असलेली प्राणी संपदा, वनसंपदा, भौगोलिक परिस्थिती याविषयीची माहिती इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्रा. डॉ श्रीकांत फुलसुंदर यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या फर्स्ट लेडी प्रा वैशाली फुलसुंदर, खजिनदार नारायण आरोटे, उपाध्यक्ष रवींद्र वाजगे, नारायणगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, प्रा. यादव, प्रा ओंकार मेहेर, नितीन भुजबळ, ओम पाटे तसेच रोटरियन व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Previous articleशरद पाबळे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष : दोन सप्टेंबरला पुण्यात सत्कार
Next articleमनिषा मदने यांना आदर्श क्रीडा शिक्षिका तर आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार धनंजय मदने यांना प्रदान