मनिषा मदने यांना आदर्श क्रीडा शिक्षिका तर आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार धनंजय मदने यांना प्रदान

उरुळी कांचन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन (ता. २९) हा साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षी पवार पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका सौ. मनिषा धनंजय मदने यांना आदर्श क्रीडा शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना प्रदान करण्यात आला.

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी मा.महादेव कसगावडे साहेब आणि मा.दादासाहेब देवकाते – उपजिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार मदने दाम्पत्यांना देण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह ,भवानी पेठ पुणे येथे सोमवारी (ता. २९) पॅरा पडला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

Previous articleरोटरी क्लब नारायणगाव हायवेचा आदिवासी भागात अभ्यास दौरा
Next article६५ वर्षांच्या शिवकन्यांनी जिंकली शिवप्रेमींची मने !