Home Blog Page 80

भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर महिला मोर्चा आयोजित भव्य गणपती व गौरी सजावट स्पर्धा

उरुळी कांचन

गणपती सजावट पारितोषिक
•प्रथम बक्षीस – पैठणी साडी (सौ सारिकाताई लोणारी)
•द्वितीय बक्षीस – सोन्याची नथ (सौ कविताताई खेडेकर)
•तृतीय बक्षिस – चांदीचा करंडा (कु. पुजा सणस)

॰गौरी गणपती सजावट पारितोषिक
•प्रथम बक्षीस – पैठणी साडी (डॅा सुचिस्मिता वनारसे)
•द्वितीय बक्षीस – सोन्याची नथ (सौ रेखाताई तुपे)
•तृतीय बक्षिस – चांदीचा करंडा (काजल खोमणे, साक्षी ढवळे)

गणपती व गौरी सजावट वॅार्ड निहाय पारितोषिक सौजन्य-वॅार्ड क्र.१ सौ.शामल भा. कांचन, सौ. रेश्मा सं. कांबळे, वॅार्ड क्र.२- डॅा.रक्षंधा क. धुमाळ, सौ.आम्रपाली भा. कांचन, वॅार्ड क्र.३ – सौ. अनिता सं. शेलार, सौ. सुषमा आ. चव्हाण, वॅार्ड क्र.४ – सौ.प्रतिक्षा ओं. कांचन, सौ.खुशी खु.कुंजीर, वॅार्ड क्र.५ – सौ.अर्चणा भा. जगताप, सौ.कोमल ग. कांबळे, वॅार्ड क्र.६ – सौ.सायली आ. तुपे, सौ.पल्लवी ऋ. ढवळे
सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू सौजन्य-
सौ.सिमा वि.जगताप, सौ रूपाली श्री. कांचन, सौ.नंदिनी अ. कांचन, सौ. सुवर्णा कै. कांचन.

सजावट / देखावा विषय
•स्वातंत्राचा अमृतमहोत्सव
•मंगळागौर/गावाकडच्या जनजीवनावर आधारीत देखावा
•समाज प्रबोधन पर देखावा
•पर्यावरण समतोल

नावनोंदणी मुदत
बुधवार ३१ ॲागस्ट २०२२
निरिक्षण दिवस
॰गणपती सजावट स्पर्धा – शुक्रवार २ सप्टेंबर २०२२
॰गौरी गणपती सजावट स्पर्धा – रविवार ४ सप्टेंबर २०२२
बक्षिस वितरण
मणिश्रीकृष्ण सहकार संकुल, उरूळी कांचन, ता.हवेली, पुणे.

नोंदणीसाठी संपर्क
•सौ.सारिकाताई कि. लोणारी
9922251137
•सौ कविताताई श. खेडेकर
9545411339
•डॅा सुचिस्मिता वनारसे
9860221942
•सौ रूपाली श्री. कांचन
8600605100
•सौ रेखाताई सु. तुपे
9075574370
•कु. पुजा दि. सणस
9075021818
•कु काजल ल. खोमणे
7887555964
•सौ प्रतिक्षा ओं. कांचन
9579953993

हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्त्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांची कामे मार्गी: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून केंद्रीयमंत्री गडकरी यांचे आभार

उरुळी कांचन

पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून आपण सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या रस्त्यांच्या कामांबाबत निर्णय सतत बदलले जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याची बाब केंद्रीयमंत्री गडकरी यांना पत्र पाठवून निदर्शनास आणली होती. या पत्राची दखल घेऊन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी जलदगतीने निर्णय घेत या सर्व महामार्गांची कामे मार्गी लावली आहेत.

नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ४ महिन्यात डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे निर्देश कन्सल्टंन्ट संस्थेला देण्यात आले आहेत, तर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या एलिव्हेटेड रस्त्यांसाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या गंभीर अपघाताची दखल घेऊन हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची माझी मागणीही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी उचलून धरली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या कामाचे नियोजन करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.

आज केंद्रीयमंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा घेताना चाकणपासून २७ कि.मी. अंतरावर मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कची घोषणा करीत माझ्या सर्वच मागण्यांची पूर्तता केली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने गडकरी साहेबांचे मन:पूर्वक आभारी असल्याची भावना खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया-डॉ.एन.एस.गायकवाड

दिनेश पवार : दौंड

संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे.आपल्या हातून समाजोपयोगी संशोधन घडायला हवे.आपण लोकांच्या कल्याणासाठी संशोधन करावे.जर गुणवत्ता पूर्ण संशोधन केले तर त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते.महात्मा जोतीराव फुले,संत ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान आजही उपयुक्त आहे.

मार्गदर्शकाने स्वतः ची गुणवत्ता राखून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला पाहिजे असे विचार प्राचार्य डॉ.एन. एस.गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित मराठी पीएच.डी.सिनोप्सेस सादरीकरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी डॉ.राजेंद्र थोरात, डॉ.नानासाहेब पवार, डॉ.अरुण कोळेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र ठाकरे,उपप्राचार्य डॉ.संजय जडे,डॉ.संजय जगताप,डॉ.संदीप वाकडे,प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नम्रता मेस्त्री यांनी केले.आभार डॉ.अतुल चौरे यांनी मानले.

लंडनमध्ये श्री गणरायाची दहा वर्षापासून होतेय स्थापना

नारायणगाव : (किरण वाजगे)

सातासमुद्रापलीकडे म्हणजेच लंडन येथे २०१३ साली नारायणगावचे भूमिपुत्र सागर कुलकर्णी यांनी राजे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळाची स्थापना केली होती. गेल्या दहा वर्षापासून लंडन येथील होन्स्ले शहरात ते आपल्या भारतीय बांधवांसह सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे.

याशिवाय दिवाळी गुढीपाडवा रंगपंचमी संक्रांत असे भारतीय सण देखील मंडळाच्या वतीने धुमधडाक्यात साजरे केले जातात. या सर्व उत्सवांना अर्थातच मराठी स्पर्श असतो. या निमित्ताने लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठी भारतीय तसेच भारतीय उपखंडातील नेपाळ, बांगलादेश या देशांमधील हिंदू बांधवही एकत्र येऊन अत्यंत उत्साहात हे सर्व सण साजरे करतात. यातून भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली असल्याचे पहायला मिळते.

परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांना एकत्र येता येते तसेच पाश्चिमात्य देशातील नागरिकांनाही भारतीय संस्कृतीबद्दल खूप आकर्षण असल्याने तेही या उत्सवांमध्ये सहभागी होतात. परदेशातच जन्माला आलेल्या व तेथेच स्थायिक होत असलेल्या भारतीयांच्या पुढील पिढीलाही अशा आपल्या हिंदू संस्कृतीची व थोर महापुरुषांची माहिती मिळत असल्याने सागर कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक वेळा कौतुक देखील झाले आहे.

यावर्षी साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवामध्ये सागर कुलकर्णी यांच्यासह अतुल पवार, मोनिका पवार, अवधूत पवार, योगेश गोडसे, प्रियांका गोडसे, ओवी गोडसे, आकाश आवारी, अनुजा आवारी, अरिन आवारी, आन्वी आवारी, विशाल नानवकर, अमिता नानवकर, कृषीव नानवकर, अनुज जयस्वाल, रितिका जयस्वाल, समर्थ जयस्वाल, विजय ठाकूर, अश्विनी ठाकूर, रणवीर ठाकूर, राकेश राणे, कीर्ती राणे, ध्रुव राणे, कमलेश राठोड, कनिष्का राठोड, अन्विता राठोड, अनुप गायकवाड, साक्षी गायकवाड व यश गायकवाड आदींनी यांनी सहभाग घेतला.

तंटामुक्ती अध्यक्षच झाला तडीपार

नारायणगाव ( विशेष प्रतिनिधी) :

सध्या सुरु असलेला गणेशोत्सव सुरळीतपणे व शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील १४ जणांना नऊ दिवसांसाठी जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे फर्मान नारायणगाव पोलिसांनी संबंधितांना बजावले आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

 

दरम्यान या तडीपार चौदा गुन्हेगारांमध्ये चक्क (बोरी ता. जुन्नर ) येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष रोहन अनिल बेल्हेकर हा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी दिलेल्या तडीपार आदेशानुसार नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सनी रमेश तलवार, अक्षय रमेश तलवार ( दोघेही राहणार पेठ आळी, नारायणगाव ता. जुन्नर ), अजय उर्फ सोन्या राठोड ( राहणार चौदा नंबर, कांदळी वडगाव ता.जुन्नर), आवेश आदम आतार, आकाश भाऊ गोफणे( दोघेही राहणार नानूपाटे नगर, नारायणगाव ता. जुन्नर ), सलमान अब्दुल रहमान मलिक , साहिल रफिक मुलानी( दोघेही राहणार पाटे-खैरे मळा, नारायणगाव, ता. जुन्नर ), सुशिल उर्फ बाळा राजु शिंदे, कृष्णा प्रताप माने ,सुरज बाळासाहेब चव्हाण , मोसिन फिरोज इनामदार, (सर्व राहणार इंदिरानगर नारायणगाव , ता. जुन्नर), गुरमीत बलवीर सिंग( राहणार कोल्हेमळा नारायणगाव , ता. जुन्नर ), रोहन अनिल बेल्हेकर (राहणार बेल्हेकरमळा, ता.जुन्नर), सुजित उर्फ गणपत संजय गाडेकर, (रा.नारायणगाव,ता.जुन्नर)
या आरोपींना आज( ता.२) सकाळी आठ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जुन्नर तालुक्यातुन तडीपार करण्यात आले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चौदा आरोपींना जुन्नर तालुक्यातून तडीपार करावे असा प्रस्ताव नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांना पाठवण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या प्रवेश करण्याच्या मनाई आदेशानुसार संबंधित चौदा आरोपींना आज सकाळ पासून गणेशोत्सव काळात पुढिल नऊ दिवस तडीपार करण्यात आले आहे. हे आरोपी तडीपार कालावधीत तालुक्यात आढळुन आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड

कुरकुंभ ,सुरेश बागल

भारतीय मजदूर संघाच्या भुवनेश्वर आडिसा २६,२७,२८ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या अखिल भारतीय कार्य समितीच्या बैठकीत नागपूर (महाराष्ट्र) येथील भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रवींद्रजी हिमते यांची भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.

यापूर्वी महामंत्री या पदावर कार्यरत असलेले श्री बिनय कुमार सिन्हा यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे जून २०२२ मध्ये महामंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर केल्या नंतर श्री रविंद्र हिमते यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

श्री रवींद्र हिमते हे मूळचे नागपूर येथील असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विभागीय लेखापाल म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. भारतीय मजदूर संघातील गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असून नागपूर जिल्हा मंत्री, विदर्भ प्रदेश पदाधिकारी, परिवहन मजदूर महासंघ, भारतीय मजदूर संघ केंद्रीय सचिव, उद्योग प्रभारी ते राष्ट्रीय महामंत्री असा त्यांचा भारतीय मजदूर संघातील प्रवास आहे. मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, देशभर प्रवास ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे, महामंत्री श्री मोहन येणुरे, प्रदेशाचे सर्व पदाधिकारी , सर्व उद्योग व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने श्री रविंद्रजी हिमते यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या .

कड्यावरील गणपती चरणी गिर्यारोहक नतमस्तक

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात आणि माथेरान डोंगर रांगेच्या कड्यावर नेरळ माथेरान मिनी ट्रेन चे मोटारमन श्री राजाराम खडे व त्यांचे सहकारी यांच्या तब्बल १४ वर्षांच्या परिश्रमानंतर साकारण्यात आलेल्या ५२ फुटी कड्यावरच्या निसर्गराजा गणपती चरणी स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप (मोशी) आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी नतमस्तक होत, जयजयकार करीत गणरायांच्या आगमनाचे मोठ्या भक्ती भावाने जल्लोषात स्वागत केले.

या मोहिमेची सुरवात माथेरान वाहनतळ क्षेत्रातून झाली. टॉयट्रेनच्या रुळावर अर्ध्या तासाची पदभ्रमंती केल्यावर कड्यावरच्या निसर्ग राजा गणपतीचे दर्शन होते. एका बाजूला १८०० फूट खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगररांगेत प्रसन्न करणाऱ्या गणपतीचे भव्य दिव्य आणि उंचच उंच रूपास गिर्यारोहकांनी येथून वंदन केले.

पुढे नेरळ माथेरान रुळाचा मार्ग सोडून दरी मध्ये उतरत छोट्या निसरड्या पाऊलवाटेने १५ मिनिटांची पदभ्रमंती करीत ५२ फुटी कड्यावरील गणपतीच्या पायथ्याशी जात गिर्यारोहकांनी नतमस्तक होत जयजयकार करीत मोठ्या उत्साहात गणरायांचे स्वागत केले.

या मोहिमेत स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप(मोशी) आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या अरुण देशमुख, आमित साळुंखे, समीर राहणे, माणिकराव पाटील, भागवत यादव, सज्जन ताकतोडे, संतोष दिवेकर, विशाल सोनावणे, राहुल वावळ, नितीन हुंबड, बाबाजी शेटे, रवि गाढवे, तानाजी राजगुडे, संतोष सोनावणे आणि डॉ.समीर भिसे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड

कुरकुंभ ,सुरेश बागल

भारतीय मजदूर संघाच्या भुवनेश्वर आडिसा २६,२७,२८ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या अखिल भारतीय कार्य समितीच्या बैठकीत नागपूर (महाराष्ट्र) येथील भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रवींद्रजी हिमते यांची भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.

यापूर्वी महामंत्री या पदावर कार्यरत असलेले श्री बिनय कुमार सिन्हा यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे जून २०२२ मध्ये महामंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर केल्या नंतर श्री रविंद्र हिमते यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

श्री रवींद्र हिमते हे मूळचे नागपूर येथील असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विभागीय लेखापाल म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. भारतीय मजदूर संघातील गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असून नागपूर जिल्हा मंत्री, विदर्भ प्रदेश पदाधिकारी, परिवहन मजदूर महासंघ, भारतीय मजदूर संघ केंद्रीय सचिव, उद्योग प्रभारी ते राष्ट्रीय महामंत्री असा त्यांचा भारतीय मजदूर संघातील प्रवास आहे. मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, देशभर प्रवास ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे, महामंत्री श्री मोहन येणुरे, प्रदेशाचे सर्व पदाधिकारी , सर्व उद्योग व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने श्री रविंद्रजी हिमते यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या .

नारायणगाव सोसायटीची आर्थिक उलाढाल तालुक्यात सर्वोत्कृष्ट – संजय काळे

नारायणगांव : ( विशेष प्रतिनिधी )

जुन्नर तालुक्यात नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची आर्थिक उलाढाल सर्वात जास्त असून संस्थेचे कामकाज देखील सर्वोत्कृष्ट आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी केले.
नारायणगाव विकास सोसायटी या संस्थेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव येथील श्री मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. याप्रसंगी संजय काळे बोलत होते. यावेळी विघ्नहरचे सह. साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या शेतकरी सभासदांना १०% लाभांश वाटप करण्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले .

सभेप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोषनाना खैरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला केला. सर्व सभासद शेतकऱ्यांचे व प्रमुख अतिथींचे स्वागत उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी केले.

संस्थेचे सन २०२१ – २२ अहवाल सालात २५४६ सभासद असुन वसुल भागभांडवल २ कोटी ३४ लक्ष आहे. गुंतवणुक ३ कोटी १५ लक्ष आहे . चालु खरिप हंगामात संस्थेने ११५० सभासदांना (क्षेत्र – १०२४ हेक्‍टर साठी ) १३ कोटी ५० लाखाचे पिककर्ज वाटप केले आहे. तसेच मध्यमुदत आणि दिर्घमुदत कर्जाचे वाटप सभासदांच्या मागणी प्रमाणे देण्यात येत आहे .एकुण २६ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फ़ुले शेतकरी कर्ज मुक्ति योजने अंतर्गत संस्थेच्या ४०६ सभासदांना २ कोटी ८५ लाख रूपये रकमेचा कर्जमाफ़ी चा लाभ मिळाला आहे. सन २०१७ -१८ , २०१८ – १९, २०१९ – २० या वर्षात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम रुपये ५० हजार
देण्याचे जाहिर केले आहे.

संस्थेच्या ११५१ सभासदांची माहिती संस्थेने राज्यशासनाकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून दिली आहे . तसेच मागील हंगामा मध्ये राज्यशासनाने शेतकऱ्यांकडून खरिप कर्जाचे व्याज वसुल केले आहे. या व्याज परताव्याचा ९३३ सभासदांचा सुमारे ५० लाख रूपये रकमेचा प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर केला आहे. त्या व्याजाच्या रकमा लवकरच सभासदांच्या बँक बचत खात्यात जमा होतील . येत्या काही काळात ऑनलाइन डिजीटल ७-१२, ८अ उतारे काढून देण्याची तसेच ई – पिकपाहणी करण्याची सुबिधा उपलब्ध केली जाणार आहे . तसेच भविष्य्काळात संस्थेच्या वतीने बहु उद्देशीय व्यापारी संकुल उभारुन विविध व्यवसाय उभारण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष संतोषनाना खैरे यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजयराव काळे यांच्या हस्ते संस्थेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सर्वात अग्रेसर कर्जवाटप व वसुली अस्ल्याचे सांगून जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना फक्त ८ % व्याजदराने फ्लॅट खरेदीसाठी ७५ लक्ष रुपये कर्ज देणार असल्याचेही श्री काळे यांनी जाहीर केले.

सभेप्रसंगी विघ्नहर सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेस कर्ज वसुलीसाठी कारखान्यामार्फत मदत केली जाईल असेही जाहीर केले. नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, कृषीरत्न ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले .

याप्रसंगी प्रकाश पाटे, पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेच्या माजी उपाध्यक्षा राजश्री बोरकर, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, नारायणगावचे माजी सरपंच अशोक पाटे, सदानंद खैरे, डी के भुजबळ, संतोष वाजगे, यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथशेठ शेटे, रघुनाथ लेंडे, पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेचे वरीष्ठ विभागीय अधिकारीसुभाष कवडे, बँकेचे वसुली आधिकारी सुनिल ताजणे, नारायणगांवचे तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, वारुळ्वाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवदत्त संते, पत्रकार अतुल कांकरिया, सुरेश वाणी, अशफाक पटेल, रविंद्र कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सुत्र संचालन संस्थेचे सचिव गणेश गाडेकर यांनी केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी आभार मानले .

नारायणगाव महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उत्साहात आयोजन

नारायणगाव (किरण वाजगे)

दि. २९ ऑगस्ट हा दिवस हॉकी खेळातील जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ग्रामोनती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुंजाळवाडी माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केलेले हरिश्चंद्र नरसुडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

याप्रसंगी नरसुडे सर यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास खेळाडूंची मानसिकता आणि खेळाडू कसे घडावेत यासाठी आजपर्यंत ग्रामोन्नती मंडळाने केलेल्या प्रयत्नांची यशोगाथा मांडली. महाविद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळक, लहुजी वस्ताद आणि महात्मा फुले यांच्या व्यायाम आणि तालमीची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचे वास्तव्य असते. शरीरास व्याधी असेल तर मनुष्य नीट विचार करू शकत नाही . त्यासाठी प्रत्येकाने आपले शरीर सुदृढ व बळकट ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ आणि व्यायामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी इतिहास विभागातील प्रा.डॉ.लहू गायकवाड यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.

प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रसूल जमादार यांनी प्रत्येकाच्या तब्येतीविषयी आरोग्य निर्देशांक कसा काढावा याविषयी मार्गदर्शन केले. क्रीडा संचालक ओंकार मेहेर यांनी यादिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. महाविद्यालयातील विविध खेळ विषयक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद होता.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यात सहभाग घ्यावा.
महाविद्यालयाचे क्रीडांगणावर ४०० मीटर धावण्यासाठीचा ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यासाठी उप प्राचार्य प्रा. गणपत होले, कला शाखा समन्वयक प्रा. शरद कापले व इतर सर्वांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाच्या प्रा. अश्विनी गायकवाड यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना पुणे ग्रामीणचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी मानले.