Home Blog Page 138

शिवरायांचे जल व्यवस्थापन

गणेश सातव ,वाघोली

आज २२ मार्च

जागतिक जल दिवस

कुठल्याही गड किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे. त्यात सह्याद्रीत व एकंदर भारतात चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची साठवणूक शिवराय अतिशय काटेकोरपणे करत असत. शिवकाळात विजेचा शोध लागला नव्हता. त्यामुळे विद्युतपंपाने पाणी खेळवणे, हे त्या काळी शक्य नव्हते.

मात्र त्याही परिस्थितीत शिवनिर्मीत प्रत्येक गडकिल्ल्यावर वर्षभर पुरेल व प्रसंगी गडावर जर हल्ला झाला तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठी कसा राहील, याची योग्य ती काळजी शिवरायांनी घेतलेली आहे. त्याचे मुख्य कारण त्याकाळी जलाभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या साहाय्याने पाणीसाठा करता येऊ शकतो, हे तत्कालीन पाथरवटांच्या (खडक फोडणारी जमात) लक्षात आले होते. त्यामुळे अशा हरहुन्नरी लोकांकडूनच शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी अथवा हौद किंवा दगडांच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून पाणी सतत पाझरत राहील याची व्यवस्था केली होती.

त्याचबरोबर अशा जलाभेद्य खडकांची जर मुबलकता आढळली तर त्यातले मधले खडक अलगद काढून किंवा त्यांना पाणी पाझरत राहील इतके तासून तलाव तयार केले व पाण्याची वर्षभर मुबलकता कशी राहील, याकडे विशेष लक्ष दिले. रायगडावरील गंगासागर तलाव, कोळींब तलाव, सज्जनगडावरील सोनाळे तलाव, प्रतापगडावरील रहाटाचे तळे, भवानी तलाव ही त्याची काही उदाहरणे आहेत.

त्याचबरोबर सपाट व नागरी वस्त्यांमध्ये शिवरायांनी विहिरी, तलाव, पाणवठे खोदून घेतले होते. रायगडावरील शिलालेखात रायगड बांधणा-या हिरोजी इंदुलकर यांनी.. ‘वापी, कुप, तडाग’ असा केलेला उल्लेख फार महत्त्वाचा आहे. राजधानी रायगडाच्या दृष्टीने पाणीसाठा गंगासागर, हत्ती तलाव, हिरकणी तलाव, काळा हौद, कुशावर्त तलाव, चांभार टाके, हनुमान टाके अशा विपूल पाणी साठवण्याच्या जागा वर्षभर पुरेसा पाणी पुरवठय़ाच्या दृष्टीने शिवरायांनी गड बांधतानाच करवून घेतल्या होत्या. इतर किल्ल्यांवरही पाण्याची मुबलकता लोकांना उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याचे नियोजन अगदी काटेकोर होते.

किल्ले मकरंदगड, राजमाची या गडावरून आजही पायथ्याशी असणाऱ्या गावात पाणीपुरवठा होतो.

NESK 1999 च्या SSC बॅच च्या माध्यमातून ठिबकसिंचन मार्फत कायमस्वरूपी पाण्याची सुविधा

धनंजय साळवे

वैकुंठधाम स्मशानभुमी कवठे येमाई येथील मोकळ्या जागेत समाजातील काही दानशुर व्यक्तीनी फुलझाडे व फळझाडांची लागवड केली आहे भविष्यकाळात हिच झाडे आपल्याला प्राणवायु ,सावली देऊन परिसरातील सुशोभिकरणात भर घालणार आहे.

या नवीन लागवड केलेल्या झाडांना कायम स्वरूपी पाण्याच्या सोयी साठी नेहमीच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सहभागी असणार्या NESK 1999 च्या SSC बॅच च्या माध्यमातून ठिबकसिंचन मार्फत कायमस्वरूपी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

कल्पेश बाफना,सोपान वागदरे,गावडे सर या १९९९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कामी पुढाकार घेतला.

या कामी सरपंच श्री रामभाऊ सांडभोर, ग्रा पं सदस्य श्री मधुकर रोकडे, ग्रा, पं कर्मचारी श्री हौशीराम शिंदे, अजित शिंदे,अमोल पंचरास यांचे सहकार्य लाभले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंजाळवाडी सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

धनंजय साळवे

कवठे येमाई – मुंजाळवाडी येथील बापुसाहेब गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने विजय मिळविला होता.या सोसायटीची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली होती.

सहकार परीवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -कांदळकर साहेबराव भाऊसाहेब,किठे देविदास तुकाराम,देवकर सोपान मारुती ,मुंजाळ समिंद्राबाई हनुमंत, मुंजाळ भाऊ बबन ,मुंजाळ पांडुरंग गोविंद तर एक सदस्य अंकुश कवठेकर उघडे हे बिनविरोध निवडुण आले होते चेअरमनपदी मुंजाळ पांडुरंग गोविंद व उपचेअरमनपदी देवकर सोपान मारुती यांची निवड झाली.

यानिमित्त गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.याप्रसंगी प्रदिप वळसे पाटील,घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेद्र गावडे,सा.कार्यकर्ते, जानकुशेठ मुंजाळ,युवा नेते प्रशांत राजेंद्र गावडे, स्वप्निल गावडे हे उपस्थित होते.

योगेश पाटे आदर्श सरपंच, डॉ वर्षा गुंजाळ आदर्श वैद्यकीय अधिकारी तर नितीन नाईकडे आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित

किरण वाजगे – नारायणगाव (ता.जुन्नर) ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार पाटे यांना प्रदान करण्यात आला.

जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांना आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार व ग्रामपंचायत नारायणगावचे ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य व माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यांसह विविध मान्यवर‍ांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नारायणगाव ग्रामपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदचा आदर्श सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार देऊन सन्मान झाल्याने नारायणगावसह जुन्नर तालुक्यात सरपंच योगेश पाटे, डॉ. वर्षा गुंजाळ व ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांचे सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

नारायणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष दांगट, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, राजेश बाप्ते, गणेश पाटे, अक्षय वाव्हळ, संतोष पाटे, ज्ञानेश्वर औटी, मेहबुब काझी, भागेश्वर डेरे, संजय गुंजाळ, किरण ताजणे, विकास तोडकरी, अजित वाजगे, नंदु अडसरे उपस्थित होते.

नारायणगावात कोरोना काळातील अंत्यसंस्कारासाठी व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यास झालेली गॅस शवदाहिनीची मदत, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन सारखे प्रोजेक्ट, व्हिजन आणि डेव्हलपमेंट तसेच कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य या सर्व गोष्टींचा निकष पाहून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभात आदर्श जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, उत्कृष्ट अभियंता आदी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.

दोन वर्षापासुन फरार असलेल्या पेठ येथील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उरुळी कांचन

डोक्यात कोयत्याने वार करून मागील दोन वर्षापासुन स्वतःची ओळख लपवुन फरारी असलेल्या पेठ येथील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

चेतन उर्फ मयूर रामदास शेलार (वय-२२, रा. पेठ, नायगाव, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ -नायगाव येथील सुधाकर पोपट अडागळे यांनी चेतनच्या अंगावर गुलाल टाकला होता. चेतन शेलार याने सुधाकर अडगळे यांना रस्त्यात अडवून तसेच घरी जाऊन मला गुलाल का लावला याचा राग मनात धरून सुधाकर अडागळे यांच्या डोक्यात कोयत्याने वर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अडागळे गंभीररीत्या जखमी झाले होते. यावरून चेतन शेलार याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून चेतन शेलार हा पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच तो राहण्याची जागा सतत बदलत होता. त्यामुळे तो मिळून येत नव्हता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक मदत घेतली परंतु तो कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झात होते. परंतु पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली त्यानुसार त्यास सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई लोणी काळभोर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार सोनवणे, विजय जाधव, पोलीस नाईक दिगंबर जगताप महेश भोंगळे व विशाल बनकर यांच्या पथकाने केली आहे.

डिंग्रजवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेत चऱ्होलीचा सावतामाळी संघ विजेता

धनंजय साळवे

कवठे येमाई- डिंग्रजवाडी येथे भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन श्री.प्रफुलशेठ शिवले यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मा.अध्यक्ष आनंद फडतरेमामा,पिंटुशेठ सरडे ,छबुराव गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत
प्रथम क्रमांक :- सावतामाळी चर्होली बु।।
दुसरा क्रमांक :- डिंग्रजवाडी
तिसरा क्रमांक :- निरगुडसर
चतुर्थ क्रमांक :- दिघी या संघांनी मिळविला.अतुलदादा काळजे,हरुण,बाबु हिवरेकर ,गणेश वळसे,विजय बगाटे,मंगेश सोमासे यांनी उत्कृष्ठ खेळ केला.

या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग नोंदविला.विजेत्या संघांचे शिरुर तालुका अध्यक्ष बाबाजी गावडे,उपाध्यक्ष सायकरतात्या,सचिव अमोल शिंदे, पारनेर तालुका अध्यक्ष रावसाहेबदादा वराळ,सचिव सुधिरशेठ वाखारे,शिरुर तालुका युवा सरचिटणीस पवनराजे जाधव,युवानेते विठ्ठल जाधव,पुणे जिल्हा शुटींग व्हॉलीबॉल अध्यक्ष राजुशेठ गावडे या सर्वांनी अभिनंदन केले.

स्व.स्वप्निल कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धा

उरुळी कांचन

ग्रामीण भागातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळाला तसेच उत्तम प्रकारे उद्योजक साहित्यिक लेखक कवी निर्माण व्हावा यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

उनाड चषक स्पर्धेच उदघाटन सरपंच विठ्ठल शितोळे तसेच विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश भोसले, माजी सरपंच ताराचंद कोलते, संजय गांधी निराधार योजनेचे हवेली तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, माजी उपसरपंच नारायण शिंदे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मुकिंदा काकडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

सर्वज्ञ फर्निचरचे गणेश कोलते व भाजपा युवा मोर्चा हवेली तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान – कोरेगावमुळ ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगावमुळचे लेखक कवी कादंबरीकार स्व.स्वप्निल रामदास कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून वर्षे दुसरे आहे.

यावेळी उत्कृष्ट पहिले बक्षीस उद्योजक बापुसाहेब शितोळे, दुसरे बक्षीस योगेश शितोळे, तिसरे बक्षीस नारायण शिंदे, प्रितम शितोळे, चौथे बक्षीस जालिंदर कड यांच्या माध्यमातून बक्षीस ठेवण्यात आले.

ट्रॉफी सौजन्य मुकिंदा काकडे, क्रिकेट फिट सौजन्य तंटामुक्ती अध्यक्ष संपत डिंबळे, गणपत गायकवाड यांचे ठेवण्यात आले. युवराज कोलते, सिद्धार्थ कांबळे, स्वप्निल मोरे, अर्जून रगडे, मनोज शेलार, हरिभाऊ बोधे, अशोक मुरकुटे यांची वैयक्तिक पातळीवर बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य निखिल पवार, तंटामुक्ती माजी अध्यक्ष योगेश गायकवाड, सचिन कड, शरद कोलते, समाधान अवचट सह अनेक युवक क्रिकेट प्रेमी खेळाडू उपस्थित होते.

बिबट सफारीसाठी विधिमंडळात माझाच पाठपुरावा – माजी आमदार शरद सोनवणे

नारायणगाव : (किरण वाजगे)

गेल्या आठवडाभरापासून जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा मुद्दा थेट राज्यपातळीवर चांगलाच गाजतोय. यासाठी सोशल मीडिया मध्ये सुद्धा मोठी प्रतिक्रिया जनमान्यांसहित अनेकांनी दिली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे यांनी बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले याविषयी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. व ही बिबट सफारी जुन्नर मध्येच व्हावी असा शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला दिनांक २२ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे आज जाहीर केले.

यावेळी शरद सोनवणे म्हणाले की, २०१७ साली वन विभागाचे मुख्य सचिव जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारीची जागा पाहून गेले होते. त्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर २०१८ साली युती शासनाच्या वतीने बिबट सफारी होण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथील वन विभागाची जागा सर्वे करून सुनिश्चित करण्यात आली.

त्याबाबतचा अध्यादेश देखील युती शासनाच्या वतीने काढण्यात आला होता.
जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतानाच विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी बिबट सफारीसाठी कुठेही पाठपुरावा न करता साधे एक पत्रही कोणत्याच विभागाला, मंत्र्याला अथवा विधिमंडळात दिले नाही. बिबट सफारी नुकतीच बारामतीला मंजूर झाली. त्याला निधी देखील मंजूर झालला. त्यानंतर विद्यमान आमदार बेनके यांना जाग आली. अशी टीका देखील सोनवणे यांनी केली.
बिबट सफारीचा लढा सर्वसामान्यांनी मनावर घेतला असून कोणत्याही परिस्थितीत बारामतीला आम्ही बिबट सफारी होऊ देणार नाही. असा इशारा शरद सोनवणे यांनी दिला.

दरम्यान पिंपळवंडी येथील रायगड निवासस्थानात आयोजित केलेलेल्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, बाजार समितीचे उपसभापती दिलिप डुंबरे, पंचायत समिती सदस्य जिवन शिंदे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

संभाव्य बिबट सफारी बाबत माजी आमदार शरद सोनवणे यांनी नेमकी भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचेच असल्यामुळे विद्यमान आमदार अतुल बेनके हे बारामतीला मंजूर झालेल्या अथवा होणाऱ्या संभाव्य बिबट सफारीला तीव्र विरोध करू शकणार नाही. म्हणून मला शासन निर्णय बदलत नाही तोपर्यंत उपोषणाला बसावेच लागेल. या पत्रकार परिषदेत माजी आमदार सोनवणे यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्यावर देखील टीका केली.

गणेश रत्नपारखी यांचा राष्ट्रीय अक्कलकोट समाजभुषण पुरस्काराने गौरव

धनंजय साळवे

कवठे येमाई येथील दानशुर तथा समाजसेवेत अग्रेसर असणारे प्रतिष्ठीत व्यापारी श्री.गणेश माधवराव रत्नपारखी यांना दिनांक १९मार्च २०२२ रोजी अक्कलकोट येथे राष्ट्रीय अक्कलकोट समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या वतीने ९वे राष्ट्रीय अक्कलकोट भुषण पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या गणमान्य व्यक्तींना यावेळी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महेश ईंगळे नगराध्यक्ष अक्कलकोट हे होते .प्रमुख अतिथी मा.श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले राजेसाहेब अक्कलकोट संस्थान अक्कलकोट हे होते.

या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणुन डॉ.राजीमवाले,प.पु.अण्णु महाराज,श्रीमती डॉ.नंदा शिवगुंडे, डॉ.सौ.बागल,डॉ.लोहार,वास्तशास्रज्ञ रविराज आहेर,सरकारी वकील विध्यानंद जोग रत्नागिरी,डॉ.संजय भागवत,मा.जयेश नाईक अध्यक्ष श्री.स्वामी समर्थ मंदीर मडगाव गोवा,डॉ.वाचासुंदर,प्रा.शिवशरण अचलेर,डॉ.बासु व डॉ.सपना.ई.मान्यवर होते.या पुरस्काराने निश्चीतच कवठे गावचे नाव ऊंचावले आहे.गणेश माधवराव रत्नपारखी यांचे पं.स.श्री.डॉ.सुभाष पोकळे,घोडगंगा का.चे संचालक राजुशेठ गावडे,सरपंच रामदासशेठ सांडभोर, मा.पं.स.सुदामभाऊ ईचके,युवानेते बाळासाहेब डांगे,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,येसक्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर उपाअध्यक्ष डॉ.उचाळे,जगदंबा स्पोर्टचे अमोल शिंदे,विजय बगाटे,पवन जाधव,श्रीराम ईचके, मा.सरपंच बबनराव पोकळे यांनी अभिनंदन केले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सागर ताले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

उरुळी कांचन

सागर तुकाराम ताले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सर्वच थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून उरुळी कांचन जिल्हा परिषद शाळे मधून शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली असून आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे शेतकरी तुकाराम ताले यांच्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास करून पीएसआय होण्याचे आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले मी छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा घेऊन मी माझी घोड दौड यापुढे चालू ठेवणार आहे असे मत सागर ताले यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, महात्मा गांधी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजय तुपे, पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाळेकर , संत यादवबाबा शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन, भाजपचे नेते सुनिल तुपे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कामठे, निलेश लोंढे, आई नर्मदा ताले, बंधू आकाश ताले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.