डिंग्रजवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेत चऱ्होलीचा सावतामाळी संघ विजेता

धनंजय साळवे

कवठे येमाई- डिंग्रजवाडी येथे भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन श्री.प्रफुलशेठ शिवले यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मा.अध्यक्ष आनंद फडतरेमामा,पिंटुशेठ सरडे ,छबुराव गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत
प्रथम क्रमांक :- सावतामाळी चर्होली बु।।
दुसरा क्रमांक :- डिंग्रजवाडी
तिसरा क्रमांक :- निरगुडसर
चतुर्थ क्रमांक :- दिघी या संघांनी मिळविला.अतुलदादा काळजे,हरुण,बाबु हिवरेकर ,गणेश वळसे,विजय बगाटे,मंगेश सोमासे यांनी उत्कृष्ठ खेळ केला.

या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग नोंदविला.विजेत्या संघांचे शिरुर तालुका अध्यक्ष बाबाजी गावडे,उपाध्यक्ष सायकरतात्या,सचिव अमोल शिंदे, पारनेर तालुका अध्यक्ष रावसाहेबदादा वराळ,सचिव सुधिरशेठ वाखारे,शिरुर तालुका युवा सरचिटणीस पवनराजे जाधव,युवानेते विठ्ठल जाधव,पुणे जिल्हा शुटींग व्हॉलीबॉल अध्यक्ष राजुशेठ गावडे या सर्वांनी अभिनंदन केले.

Previous articleस्व.स्वप्निल कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धा
Next articleदोन वर्षापासुन फरार असलेल्या पेठ येथील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या