स्व.स्वप्निल कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धा

उरुळी कांचन

ग्रामीण भागातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळाला तसेच उत्तम प्रकारे उद्योजक साहित्यिक लेखक कवी निर्माण व्हावा यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

उनाड चषक स्पर्धेच उदघाटन सरपंच विठ्ठल शितोळे तसेच विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश भोसले, माजी सरपंच ताराचंद कोलते, संजय गांधी निराधार योजनेचे हवेली तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, माजी उपसरपंच नारायण शिंदे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मुकिंदा काकडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

सर्वज्ञ फर्निचरचे गणेश कोलते व भाजपा युवा मोर्चा हवेली तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान – कोरेगावमुळ ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगावमुळचे लेखक कवी कादंबरीकार स्व.स्वप्निल रामदास कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून वर्षे दुसरे आहे.

यावेळी उत्कृष्ट पहिले बक्षीस उद्योजक बापुसाहेब शितोळे, दुसरे बक्षीस योगेश शितोळे, तिसरे बक्षीस नारायण शिंदे, प्रितम शितोळे, चौथे बक्षीस जालिंदर कड यांच्या माध्यमातून बक्षीस ठेवण्यात आले.

ट्रॉफी सौजन्य मुकिंदा काकडे, क्रिकेट फिट सौजन्य तंटामुक्ती अध्यक्ष संपत डिंबळे, गणपत गायकवाड यांचे ठेवण्यात आले. युवराज कोलते, सिद्धार्थ कांबळे, स्वप्निल मोरे, अर्जून रगडे, मनोज शेलार, हरिभाऊ बोधे, अशोक मुरकुटे यांची वैयक्तिक पातळीवर बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य निखिल पवार, तंटामुक्ती माजी अध्यक्ष योगेश गायकवाड, सचिन कड, शरद कोलते, समाधान अवचट सह अनेक युवक क्रिकेट प्रेमी खेळाडू उपस्थित होते.

Previous articleबिबट सफारीसाठी विधिमंडळात माझाच पाठपुरावा – माजी आमदार शरद सोनवणे
Next articleडिंग्रजवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेत चऱ्होलीचा सावतामाळी संघ विजेता