गणेश रत्नपारखी यांचा राष्ट्रीय अक्कलकोट समाजभुषण पुरस्काराने गौरव

धनंजय साळवे

कवठे येमाई येथील दानशुर तथा समाजसेवेत अग्रेसर असणारे प्रतिष्ठीत व्यापारी श्री.गणेश माधवराव रत्नपारखी यांना दिनांक १९मार्च २०२२ रोजी अक्कलकोट येथे राष्ट्रीय अक्कलकोट समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या वतीने ९वे राष्ट्रीय अक्कलकोट भुषण पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या गणमान्य व्यक्तींना यावेळी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महेश ईंगळे नगराध्यक्ष अक्कलकोट हे होते .प्रमुख अतिथी मा.श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले राजेसाहेब अक्कलकोट संस्थान अक्कलकोट हे होते.

या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणुन डॉ.राजीमवाले,प.पु.अण्णु महाराज,श्रीमती डॉ.नंदा शिवगुंडे, डॉ.सौ.बागल,डॉ.लोहार,वास्तशास्रज्ञ रविराज आहेर,सरकारी वकील विध्यानंद जोग रत्नागिरी,डॉ.संजय भागवत,मा.जयेश नाईक अध्यक्ष श्री.स्वामी समर्थ मंदीर मडगाव गोवा,डॉ.वाचासुंदर,प्रा.शिवशरण अचलेर,डॉ.बासु व डॉ.सपना.ई.मान्यवर होते.या पुरस्काराने निश्चीतच कवठे गावचे नाव ऊंचावले आहे.गणेश माधवराव रत्नपारखी यांचे पं.स.श्री.डॉ.सुभाष पोकळे,घोडगंगा का.चे संचालक राजुशेठ गावडे,सरपंच रामदासशेठ सांडभोर, मा.पं.स.सुदामभाऊ ईचके,युवानेते बाळासाहेब डांगे,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,येसक्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर उपाअध्यक्ष डॉ.उचाळे,जगदंबा स्पोर्टचे अमोल शिंदे,विजय बगाटे,पवन जाधव,श्रीराम ईचके, मा.सरपंच बबनराव पोकळे यांनी अभिनंदन केले.

Previous articleप्रतिकूल परिस्थितीवर मात करत सागर ताले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
Next articleबिबट सफारीसाठी विधिमंडळात माझाच पाठपुरावा – माजी आमदार शरद सोनवणे