प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सागर ताले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

उरुळी कांचन

सागर तुकाराम ताले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सर्वच थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून उरुळी कांचन जिल्हा परिषद शाळे मधून शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली असून आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे शेतकरी तुकाराम ताले यांच्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास करून पीएसआय होण्याचे आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले मी छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा घेऊन मी माझी घोड दौड यापुढे चालू ठेवणार आहे असे मत सागर ताले यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, महात्मा गांधी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजय तुपे, पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाळेकर , संत यादवबाबा शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन, भाजपचे नेते सुनिल तुपे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कामठे, निलेश लोंढे, आई नर्मदा ताले, बंधू आकाश ताले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त साने गुरुजी कथामालेच्या वतीने कथाकथन
Next articleगणेश रत्नपारखी यांचा राष्ट्रीय अक्कलकोट समाजभुषण पुरस्काराने गौरव