गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंजाळवाडी सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

धनंजय साळवे

कवठे येमाई – मुंजाळवाडी येथील बापुसाहेब गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने विजय मिळविला होता.या सोसायटीची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली होती.

सहकार परीवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -कांदळकर साहेबराव भाऊसाहेब,किठे देविदास तुकाराम,देवकर सोपान मारुती ,मुंजाळ समिंद्राबाई हनुमंत, मुंजाळ भाऊ बबन ,मुंजाळ पांडुरंग गोविंद तर एक सदस्य अंकुश कवठेकर उघडे हे बिनविरोध निवडुण आले होते चेअरमनपदी मुंजाळ पांडुरंग गोविंद व उपचेअरमनपदी देवकर सोपान मारुती यांची निवड झाली.

यानिमित्त गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.याप्रसंगी प्रदिप वळसे पाटील,घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेद्र गावडे,सा.कार्यकर्ते, जानकुशेठ मुंजाळ,युवा नेते प्रशांत राजेंद्र गावडे, स्वप्निल गावडे हे उपस्थित होते.

Previous articleयोगेश पाटे आदर्श सरपंच, डॉ वर्षा गुंजाळ आदर्श वैद्यकीय अधिकारी तर नितीन नाईकडे आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित
Next articleNESK 1999 च्या SSC बॅच च्या माध्यमातून ठिबकसिंचन मार्फत कायमस्वरूपी पाण्याची सुविधा