NESK 1999 च्या SSC बॅच च्या माध्यमातून ठिबकसिंचन मार्फत कायमस्वरूपी पाण्याची सुविधा

धनंजय साळवे

वैकुंठधाम स्मशानभुमी कवठे येमाई येथील मोकळ्या जागेत समाजातील काही दानशुर व्यक्तीनी फुलझाडे व फळझाडांची लागवड केली आहे भविष्यकाळात हिच झाडे आपल्याला प्राणवायु ,सावली देऊन परिसरातील सुशोभिकरणात भर घालणार आहे.

या नवीन लागवड केलेल्या झाडांना कायम स्वरूपी पाण्याच्या सोयी साठी नेहमीच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सहभागी असणार्या NESK 1999 च्या SSC बॅच च्या माध्यमातून ठिबकसिंचन मार्फत कायमस्वरूपी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

कल्पेश बाफना,सोपान वागदरे,गावडे सर या १९९९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कामी पुढाकार घेतला.

या कामी सरपंच श्री रामभाऊ सांडभोर, ग्रा पं सदस्य श्री मधुकर रोकडे, ग्रा, पं कर्मचारी श्री हौशीराम शिंदे, अजित शिंदे,अमोल पंचरास यांचे सहकार्य लाभले.

Previous articleगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंजाळवाडी सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार
Next articleशिवरायांचे जल व्यवस्थापन