योगेश पाटे आदर्श सरपंच, डॉ वर्षा गुंजाळ आदर्श वैद्यकीय अधिकारी तर नितीन नाईकडे आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित

किरण वाजगे – नारायणगाव (ता.जुन्नर) ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार पाटे यांना प्रदान करण्यात आला.

जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांना आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार व ग्रामपंचायत नारायणगावचे ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य व माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यांसह विविध मान्यवर‍ांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नारायणगाव ग्रामपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदचा आदर्श सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार देऊन सन्मान झाल्याने नारायणगावसह जुन्नर तालुक्यात सरपंच योगेश पाटे, डॉ. वर्षा गुंजाळ व ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांचे सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

नारायणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष दांगट, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, राजेश बाप्ते, गणेश पाटे, अक्षय वाव्हळ, संतोष पाटे, ज्ञानेश्वर औटी, मेहबुब काझी, भागेश्वर डेरे, संजय गुंजाळ, किरण ताजणे, विकास तोडकरी, अजित वाजगे, नंदु अडसरे उपस्थित होते.

नारायणगावात कोरोना काळातील अंत्यसंस्कारासाठी व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यास झालेली गॅस शवदाहिनीची मदत, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन सारखे प्रोजेक्ट, व्हिजन आणि डेव्हलपमेंट तसेच कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य या सर्व गोष्टींचा निकष पाहून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभात आदर्श जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, उत्कृष्ट अभियंता आदी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.

Previous articleदोन वर्षापासुन फरार असलेल्या पेठ येथील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंजाळवाडी सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार