Home Blog Page 99

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांची बार्टीला भेट

पुणे : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मुख्यालयाला  भेट दिली. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी भारतीय राज्यघटनेची प्रत देत त्यांचे स्वागत केले

यावेळी डॉ. मालखेडे म्हणाले, वंचित घटकांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम बार्टी करत आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी शैक्षणिक योजना प्रभावीपणे अंमलात येणे महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यापीठ बार्टीसोबत काम करेल.

सामाजिक न्यायाच्यादृष्टीने संशोधन व प्रशिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी बार्टी कटिबद्ध असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले. यावेळी बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, विभाग प्रमुख डॉ. जोत्स्ना पडियार, वृषाली शिंदे, उमेश सोनावणे, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, सुमेध थोरात व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गोकुळ भोकटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने खरपुड व म्हसेवाडी शाळेंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरूनगर-एक आदिवासी लाख आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य, खेड तालुका याच्या सहकार्याने गोकुळ रामचंद्र भोकटे पाटील(कार्याध्यक्ष खेड तालुका) यांच्या वाढदिवसानिमित्ताने जि प प्राथमिक शाळा खरपुड( ता. खेड जि. पुणे) आणि जि प प्राथमिक शाळा म्हसेवाडी( ता खेड जि. पुणे ) या दोन्ही शाळेंना भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले.

तसेच शाळेत वृक्षारोपण तसेच विद्यार्थी वर्गाला आदिवासी क्रांतीविरांची ओळख व्हावी म्हणून थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.

यावेळी संघटनेच्या वतीने आदी अंकुश ठोंगिरे (खजिनदार महाराष्ट्र राज्य), आदि रामदास गोडे (सचिव), आदि. चिमाजी ढोंगे(पुणे जिल्हा अध्यक्ष), आदि दत्तात्रय मिलखे (ता.अध्यक्ष), आदि संगीता निसरड(तालुका महिला अध्यक्षा),आदि रमेश भोकटे (ता. उपाध्यक्ष),आदि सचिन कशाळे(खजिनदार), आदि काळू भांगरे(सल्लागार),आदि भरत शिंगाडे (सचिव) बाळु वामन मदगे(चेअरमन), कृष्णा मदगे(शिक्षण समितीचे अध्यक्ष), प्रा राजु भोकटे सर तसेच दोन्ही शाळेचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो

श्रावणी कामत,लोणावळा

पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण
आज सकाळी सात वाजता धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे शहरात पसरल्याने स्थानिक नागरिक, येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन पायऱ्यांवरून वाहू लागले की पर्यटकांची भुशी धरणावर वर्षाविहाराचा अलोट गर्दी सुरु होते. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला असला तरी स्थानिक व्यावसायिकांनी धरण भरल्यानंतर देवाकडे आभार मानले तसेच यावर्षीचा पर्यटन हंगाम निर्विघ्नपणे पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली .

भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे, लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटतात . येणाऱ्या शनिवार व रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.मागील दोन वर्ष कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती . यंदा मात्र हा पावसाळी हंगाम भरून निघणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

मिशन शून्य ड्रॉपआउट अभियानात सहभागी व्हा – खासदार डॉ अमोल कोल्हे

उरुळी कांचन

राज्यभरातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ ते २० जुलै दरम्यान मिशन शून्य ड्रॉपआउट हे अभियान राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षक बंधू-भगिनी काम करतच असतात. पण त्यांना जर जनतेची साथ मिळाली, तर या अभियानाला आणखी बळ मिळेल. सर्व युवक, नागरिक यांना आवाहन आहे की, तुमच्या आसपास शाळाबाह्य मुले असल्यास नजीकच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी संपर्क साधा आणि या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजपरिवर्तनाच्या मोहिमेचे शिलेदार व्हा. जेणेकरून अशी मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील, त्यांचे भविष्य सुरक्षित होईल आणि अशा कुटुंबांच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारण्याचे सत्कर्म आपल्या हातून घडेल. असे आवाहन संसदरत्न शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

समाजपरिवर्तनाची लढाई अनेक पातळ्यांवर सुरु असते. या लढाईतील शिक्षणाचा प्रसार, शिक्षणाचा प्रत्येकाला हक्क मिळणे हा भाग देखील खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचे तुम्ही महत्त्वाचे शिलेदार ठरू शकतात.

निखिल (भैया) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त महावीर निवासी मुकबधीर विद्यालयात अन्य धान्य व खाऊ वाटप

उरुळी कांचन

सामाजिक दुरदृष्टीकोन ठेवून निरपेक्षपणे वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत जिथे गरज आहे तिथे निश्चितच मदत करावी असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शारिक सय्यद यांनी व्यक्त केले.

युवा उद्योजक निखिल (भैया) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल भैया कांचन युथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावीर निवासी मुकबधीर विद्यालय मध्ये अन्न धान्य व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी वर्ग तसेच सचिन कांचन, प्रमोद कांचन, अविनाश टकले, अमोल मेहेर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात निखिल (भैया) कांचन यांनी सर्व सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

वारूळवाडीचे विद्यमान सरपंच राजेंद्र मेहर यांना मातृशोक

नारायणगाव : किरण वाजगे

वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ कुसुम तुकाराम मेहेर (वय ७३) यांचे सोमवार दि०४ रोजी सकाळी १० वा हृदय विकाराच्या झटक्याने दुःख द निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, ३ मुली , जावई, नातवंडे असा परिवार आहे.

वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक सात रोजी वारूळवाडी येथील मीना नदी तीरावर होणार आहे.

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

सुरेश बागल -कुरकुंभ ( ता. दौंड ) येथील मळद तलावा जवळील प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्याला तरुणाला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर अशी ही भयंकर घटना घडलेली आहे.दरम्यान या हल्ल्यात ती मुलगी बचावली असून तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुल निरजे (वय २७ वर्षे रा. खटाव, जि. सांगली सध्या रा. पुणे ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अशी माहिती की हे दोघेही दुचाकी वरून हडपसर येथून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कुरकुंभ हद्दीतील मळद तलावाजवळ आले होते.

मुलीच्या घरच्यांनी मागील दोन वर्षापासून लग्नासाठी चालढकल या दोघांमध्ये वाद झाला होता.
या वादातून या तरुणाने या मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी जखमी झाली आहे. त्या क्षणी मुलीवर वार करून तो तरुण पळून जात असताना ग्रामस्थांनी पाहिले व ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले . पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून उसाच्या शेतात या तरुणाला पकडले.पोलिसांनी या तरुणाला रंगेहात पकडले व या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

थेऊरला तरुणीची दगडाने ठेचून हत्या

उरुळी कांचन

थेऊर येथे एका तरूणीची दगडाने ठेचून निर्घुनपणे हत्या करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. थेऊर पोलीस चौकीच्या समोर असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत सदर अंदाजे १८ ते २२ वर्षे वयाच्या तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिची ओळख पटलेली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर चौकी व चिंतामणी हायस्कूल समोर यशवंत सहकारी साखर कारखान्याची मोकळी जागा आहे. मंगळवारी पहाटे नागरिकांना सदर मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी सदर बाब तात्काळ लोणी काळभोर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. डॉग स्कॉड पथकास पाचारण करण्यात आले आहे.

२०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख

लोणावळा (श्रावणी कामत )

मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य परिसरात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली.. परिषदेचे हे अधिवेशन कोरोनामुळे यापुर्वी दोन वेळा रद्द करावे लागले होते..

पुणे जिल्हा पत्रकार संघ,महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद आणि हवेली तालुका पत्रकार संघाची संयुक्त बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे नियोजित अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.

यावेळी हवेली तालुका पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषदेने अधिवेशन घेण्याची तयारी दर्शविली. त्याला मराठी पत्रकार परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे २० आणि २१ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन परिषदेच्या परंपरेला साजेशे भव्य दिव्य स्वरूपात साजरे होत आहे.

खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते, अमोल कोल्हे हे या ४३ व्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील. एस.एम देशमुख, शरद पाबळे, पुणे जिल्हा संघटक सुनील जगताप, सोशल मिडीया परिषदेचे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे,हवेली तालुका अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, सुनील वाळुंज यांनी काल एमआयटी परिसराची आणि ज्या विश्वविख्यात डोममध्ये अधिवेशन होत आहे त्याची पाहणी केली तसेच एमआयटीचे विश्वस्त मंगेश कराड यांची भेट घेऊन चर्चा केली..

दोन दिवसाच्या अधिवेशनात परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन आणि समारोप होणार असल्याने लोणी काळभोरचे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

४२ वे राष्ट्रीय अधिवेशन १८,१९ ऑगस्ट २०१९ रोजी नांदेड येथे झाले होते.. त्यानंतर कोरोनामुळे अधिवेशन होऊ शकले नव्हते.. आता हे अधिवेशन होत असल्याने देशातील मराठी पत्रकारांना अधिवेशनाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे…

कनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरूनगर- कनेरसर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव बळवंतराव कानडे (दादा)यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी कनेरसर केंद्राचे प्रेरणादायी केंद्रप्रमुख आदरणीय श्री.बाळासाहेब गावडे (साहेब), पत्रकार बाळासाहेब सांडभोर ( साहेब), विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा.श्री. मच्छिंद्र दौंडकर, व्हाईस चेअरमन श्री.काळूराम लोखंडे,तसेच संचालक श्री.नरेंद्र दौंडकर, नंदू कानडे, श्री.काळूराम दौंडकर, विशाल माशेरे,शाळेचे मुख्याध्यापक श्री. नानाभाऊ गावडे, सामाजिक कार्यकर्ते,कार्यक्रमाचे आयोजक श्री.अतुलभाऊ कानडे (साहेब) शाळेतील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम.सारिका राक्षे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम ,पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.संदिप म्हसुडगे सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर यांनी केले.

मान्यवरांचा सन्मान शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु.अर्णव राहूल गायकवाड,विद्यार्थीनी देवीका प्रदिप म्हसुडगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केला.

कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले असता इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु.अर्णव राहूल गायकवाड याने खुप छान उत्तरे दिली त्यास मा.केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे साहेब यांच्या वतीने १०० रूपये बक्षिस देवून शाळ, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम यांनी केले. तर आभार शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका मॅडम यांनी मानले.