संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांची बार्टीला भेट

पुणे : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मुख्यालयाला  भेट दिली. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी भारतीय राज्यघटनेची प्रत देत त्यांचे स्वागत केले

यावेळी डॉ. मालखेडे म्हणाले, वंचित घटकांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम बार्टी करत आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी शैक्षणिक योजना प्रभावीपणे अंमलात येणे महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यापीठ बार्टीसोबत काम करेल.

सामाजिक न्यायाच्यादृष्टीने संशोधन व प्रशिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी बार्टी कटिबद्ध असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले. यावेळी बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, विभाग प्रमुख डॉ. जोत्स्ना पडियार, वृषाली शिंदे, उमेश सोनावणे, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, सुमेध थोरात व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleगोकुळ भोकटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने खरपुड व म्हसेवाडी शाळेंना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleहुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक मुक्त अभियान