गोकुळ भोकटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने खरपुड व म्हसेवाडी शाळेंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरूनगर-एक आदिवासी लाख आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य, खेड तालुका याच्या सहकार्याने गोकुळ रामचंद्र भोकटे पाटील(कार्याध्यक्ष खेड तालुका) यांच्या वाढदिवसानिमित्ताने जि प प्राथमिक शाळा खरपुड( ता. खेड जि. पुणे) आणि जि प प्राथमिक शाळा म्हसेवाडी( ता खेड जि. पुणे ) या दोन्ही शाळेंना भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले.

तसेच शाळेत वृक्षारोपण तसेच विद्यार्थी वर्गाला आदिवासी क्रांतीविरांची ओळख व्हावी म्हणून थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.

यावेळी संघटनेच्या वतीने आदी अंकुश ठोंगिरे (खजिनदार महाराष्ट्र राज्य), आदि रामदास गोडे (सचिव), आदि. चिमाजी ढोंगे(पुणे जिल्हा अध्यक्ष), आदि दत्तात्रय मिलखे (ता.अध्यक्ष), आदि संगीता निसरड(तालुका महिला अध्यक्षा),आदि रमेश भोकटे (ता. उपाध्यक्ष),आदि सचिन कशाळे(खजिनदार), आदि काळू भांगरे(सल्लागार),आदि भरत शिंगाडे (सचिव) बाळु वामन मदगे(चेअरमन), कृष्णा मदगे(शिक्षण समितीचे अध्यक्ष), प्रा राजु भोकटे सर तसेच दोन्ही शाळेचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleपर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो
Next articleसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांची बार्टीला भेट