पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो

श्रावणी कामत,लोणावळा

पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण
आज सकाळी सात वाजता धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे शहरात पसरल्याने स्थानिक नागरिक, येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन पायऱ्यांवरून वाहू लागले की पर्यटकांची भुशी धरणावर वर्षाविहाराचा अलोट गर्दी सुरु होते. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला असला तरी स्थानिक व्यावसायिकांनी धरण भरल्यानंतर देवाकडे आभार मानले तसेच यावर्षीचा पर्यटन हंगाम निर्विघ्नपणे पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली .

भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे, लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटतात . येणाऱ्या शनिवार व रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.मागील दोन वर्ष कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती . यंदा मात्र हा पावसाळी हंगाम भरून निघणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Previous articleमिशन शून्य ड्रॉपआउट अभियानात सहभागी व्हा – खासदार डॉ अमोल कोल्हे
Next articleगोकुळ भोकटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने खरपुड व म्हसेवाडी शाळेंना शैक्षणिक साहित्याचे वाटप