मिशन शून्य ड्रॉपआउट अभियानात सहभागी व्हा – खासदार डॉ अमोल कोल्हे

उरुळी कांचन

राज्यभरातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ ते २० जुलै दरम्यान मिशन शून्य ड्रॉपआउट हे अभियान राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षक बंधू-भगिनी काम करतच असतात. पण त्यांना जर जनतेची साथ मिळाली, तर या अभियानाला आणखी बळ मिळेल. सर्व युवक, नागरिक यांना आवाहन आहे की, तुमच्या आसपास शाळाबाह्य मुले असल्यास नजीकच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी संपर्क साधा आणि या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजपरिवर्तनाच्या मोहिमेचे शिलेदार व्हा. जेणेकरून अशी मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील, त्यांचे भविष्य सुरक्षित होईल आणि अशा कुटुंबांच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारण्याचे सत्कर्म आपल्या हातून घडेल. असे आवाहन संसदरत्न शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

समाजपरिवर्तनाची लढाई अनेक पातळ्यांवर सुरु असते. या लढाईतील शिक्षणाचा प्रसार, शिक्षणाचा प्रत्येकाला हक्क मिळणे हा भाग देखील खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचे तुम्ही महत्त्वाचे शिलेदार ठरू शकतात.

Previous articleनिखिल (भैया) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त महावीर निवासी मुकबधीर विद्यालयात अन्य धान्य व खाऊ वाटप
Next articleपर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो