निखिल (भैया) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त महावीर निवासी मुकबधीर विद्यालयात अन्य धान्य व खाऊ वाटप

उरुळी कांचन

सामाजिक दुरदृष्टीकोन ठेवून निरपेक्षपणे वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत जिथे गरज आहे तिथे निश्चितच मदत करावी असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शारिक सय्यद यांनी व्यक्त केले.

युवा उद्योजक निखिल (भैया) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल भैया कांचन युथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावीर निवासी मुकबधीर विद्यालय मध्ये अन्न धान्य व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी वर्ग तसेच सचिन कांचन, प्रमोद कांचन, अविनाश टकले, अमोल मेहेर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात निखिल (भैया) कांचन यांनी सर्व सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

Previous articleवारूळवाडीचे विद्यमान सरपंच राजेंद्र मेहर यांना मातृशोक
Next articleमिशन शून्य ड्रॉपआउट अभियानात सहभागी व्हा – खासदार डॉ अमोल कोल्हे