गीता जयंती निमित्त भोंडे हायस्कूलच्या १५०० विद्यार्थ्यांनी केले भगवदगीतेचे पठण

श्रावणी कामत

लोणावळा : गीता जयंतीचे औचित्य साधत लोणावळा येथील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या १५०० विद्यार्थ्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचे सामुहिक पठण केले. अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा व गीता परिवार यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी ८.०० वाजता भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात शाळेचे इयत्ता १ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील १५ व्या अध्यायाचे पठण सामुहिकरित्या केले सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे व श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे पुजन करण्यात आले .शाळेच्या शिक्षिका मुग्धापुंडे यांनी विद्यार्थ्यांना पुराणातील गोष्टींची व सुभाषितांची उदाहरणे देत संस्कृत भाषा किती सुंदर सहज सोपी आहे हे समजावून सांगितले.

यावेळी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे ,विश्वस्त राजु खळदकर ,संजय वीर ,व्हीपीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद देशपांडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल साळवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख,माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ति गव्हले ,प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे,पर्यवेक्षिका माधवी थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleशिवजन्मभूमी  फाऊंडेशनच्या वतीने नारायणगाव – शिर्डी सायकलवारी टीम, पहाटवारा स्विमिंग ग्रूपच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान
Next articleग्रामोन्नती मंडळाच्या नारायणगाव वरिष्ठ महाविद्यालयात एड्स जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन